Stocky अहवालाचे प्रकार
Stocky तुमच्या स्टॉकचे मूल्य आणि किरकोळ किमतीचा दैनंदिन स्नॅपशॉट रेकॉर्ड करू शकते. तुम्ही उपलब्ध स्टॉक रिपोर्टिंग सक्रिय केल्यानंतर, Stocky डेटा गोळा करण्यास सुरुवात करते. तुमचा पहिला उपलब्ध स्टॉक रेकॉर्ड प्रदर्शित होण्यासाठी 24 तास लागू शकतात.
या पेजवर
अहवाल अॅक्सेस करा
- तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये, अॅप्स > Stocky वर जा.
- अहवाल ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्हाला रन करायच्या असलेल्या अहवालावर क्लिक करा.
Stocky अहवाल
तुम्ही Stocky मधून खालील अहवाल पाहू शकता.
ABC विश्लेषण
तुम्ही प्रत्येक उत्पादनासाठी ABC विश्लेषण पाहू शकता, जे गेल्या 8 आठवड्यांच्या त्यांच्या विक्रीच्या इतिहासावर आधारित तुमच्या उत्पादनांचे ग्रेडिंग करते.
बेस्ट सेलर्स
तुम्ही उत्पादन किंवा व्हेरिएंट SKU नुसार तुमच्या बेस्ट सेलर्सची सूची पाहू शकता.
लो स्टॉक अहवाल
तुम्ही विक्रेता, उत्पादन किंवा व्हेरिएंट SKU वर आधारित लो स्टॉक अहवाल पाहू शकता.
लो स्टॉक विक्रेते अहवाल हे प्रदर्शित करतो की कोणत्या विक्रेत्यांकडे कमी स्टॉक असलेले व्हेरिएंट आहेत आणि कोणते व्हेरिएंट स्टॉकमध्ये नाहीत आणि त्यामुळे गमावलेला अंदाजित महसूल किती आहे. तो तुम्ही विक्रेत्याकडून ऑर्डर केलेले पण अद्याप प्राप्त न झालेले अनन्य व्हेरिएंटदेखील प्रदर्शित करतो.
लो स्टॉक उत्पादने अहवाल हे प्रदर्शित करतो की कोणत्या उत्पादनांचा स्टॉक कमी आहे आणि कोणती उत्पादने स्टॉकमध्ये नाहीत आणि विक्रेत्याकडे ऑर्डर दिलेली नाही. जर व्हेरिएंट स्टॉकमध्ये नसेल, तर तो दररोज गमावला जाणारा अंदाजित महसूलदेखील प्रदर्शित करतो.
लो स्टॉक व्हेरिएंट अहवाल हा सर्वात तपशीलवार लो स्टॉक अहवाल आहे. तुमच्याकडे किती दिवसांचा स्टॉक उरला आहे, तुमची इन्व्हेंटरी संपण्याची अंदाजित तारीख आणि ती प्राप्त होण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर आधारित तुम्ही आणखी इन्व्हेंटरी कधी पुन्हा ऑर्डर करावी याची अंदाजित तारीख यांसारखे तपशील तो प्रदर्शित करतो.
ऑर्डर्स
ऑर्डर्स अहवाल तुमच्या ऑर्डर्ससाठी महिना, आठवडा किंवा दिवसानुसार आलेख प्रदर्शित करतो. ऑर्डर्स अहवाल तुमच्या ऑर्डर्सची सूचीदेखील प्रदर्शित करतो. विक्रेता, उत्पादन किंवा व्हेरिएंट यांसारख्या विशिष्ट निकषांशी जुळणाऱ्या ऑर्डर्स पाहण्यासाठी तुम्ही फिल्टर संपादित करू शकता.
उत्पादने
उत्पादन अहवाल तुमच्या उत्पादनांबद्दलचे तपशील प्रदर्शित करतो, जसे की सद्य इन्व्हेंटरी आणि विक्रीची रक्कम.
खरेदी ऑर्डर
खरेदी ऑर्डर्स अहवाल तुमच्या प्रत्येक खरेदी ऑर्डरविषयी तपशील प्रदर्शित करतो, जसे की आगमनाचे गंतव्यस्थान, वितरणाची स्थिती आणि पेमेंट स्थिती. या अहवालात पुढील गोष्टींचाही समावेश आहे:
| स्टॉक | अहवालाच्या वेळी स्टॉकमधील सध्याचे प्रमाण. |
| ऑर्डर केलेले | प्राप्त न झालेले आणि सर्व थकीत खरेदी ऑर्डर्सवर सध्या ऑर्डर केलेले प्रमाण. जर या व्हेरिएंटचा समावेश असलेल्या एकापेक्षा जास्त थकीत खरेदी ऑर्डर्स असतील, तर हे मूल्य त्या सर्व खरेदी ऑर्डर्सवरील एकूण बेरीज दर्शवेल. |
| प्रमाण | त्या विशिष्ट खरेदी ऑर्डर्सवर त्या व्हेरिएंटचे मूळ ऑर्डर केलेले प्रमाण. ही संख्या खरेदी ऑर्डर्सपुरती मर्यादित आहे आणि आयटम्स प्राप्त झाल्यावर बदलणार नाही. |
सेल आयटम्स
सेल आयटम्स अहवाल उत्पादन किंवा व्हेरिएंटनुसार तुमचे सेल आयटम्स प्रदर्शित करतो.
SKU/व्हेरिएंट
SKU/व्हेरिएंट अहवाल प्रत्येक व्हेरिएंटचा प्रति युनिट खर्च, विक्री किंमत आणि विक्रीची संख्या प्रदर्शित करतो. प्रत्येक व्हेरिएंटचे अधिक तपशीलवार विश्लेषण तयार करण्यासाठी तुम्ही अतिरिक्त कॉलम जोडू शकता.
आकडेवारी
आकडेवारी अहवाल गेल्या 28 दिवसांच्या आणि गेल्या 7 दिवसांच्या स्टोअरच्या आकडेवारीची तुलना करतो, जसे की सरासरी ऑर्डर मूल्य आणि दररोजची सरासरी ऑर्डरची बेरीज.
उपलब्ध स्टॉकचे अहवाल
तुम्ही तुमच्या उपलब्ध स्टॉकसाठी सद्य किंवा ऐतिहासिक अहवाल पाहू शकता.
सध्या उपलब्ध असलेला स्टॉक तुमच्या इन्व्हेंटरीचे सद्य मूल्य आणि खर्च प्रदर्शित करतो.
सर्व ठिकाणांसाठीचा ऐतिहासिक उपलब्ध स्टॉक तारखेच्या कक्षेतील प्रत्येक तारखेसाठी सर्व इन्व्हेंटरीची निर्दिष्ट बेरीज, जसे की खरेदीची किंमत, मूल्य किंवा प्रमाण प्रदर्शित करतो. सर्व विक्रेते किंवा एखाद्या विशिष्ट विक्रेत्यावर आधारित बेरीज मिळवण्यासाठी तुम्ही हा अहवाल फिल्टर करू शकता.
अॅडजस्टमेंट्स
अॅडजस्टमेंट्स अहवाल प्रत्येक स्टॉक अॅडजस्टमेंटविषयीचे तपशील प्रदर्शित करतो, जसे की तारीख, कारण आणि ती करणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती.
हस्तांतरणे
हस्तांतरणे अहवाल प्रत्येक स्टॉक ट्रान्सफरविषयीचे तपशील प्रदर्शित करतो, जसे की त्याची स्थिती, मूळ ठिकाण आणि गंतव्यस्थान व ट्रान्सफरचे कारण.
नफा
नफा अहवाल तुमच्या स्टोअरची आर्थिक माहिती प्रदर्शित करतो, जसे की रिटर्न्स, ढोबळ विक्री आणि विकल्या गेलेल्या वस्तूंचा खर्च.
अहवालाचे प्रकार
उपलब्ध स्टॉकचे अनेक विविध अहवाल उपलब्ध आहेत.
एकूण खर्च
एकूण खर्च हा तुमच्या स्टॉकमधील सर्व व्हेरिएंट्ससाठी प्रत्येक व्हेरिएंटचे प्रमाण आणि त्याच्या खरेदी किमतीच्या गुणाकाराइतका असतो. या गणनेमध्ये नकारात्मक स्टॉक पातळी असलेले व्हेरिएंट्स आणि लपवलेले व्हेरिएंट्स वगळले जातात.
एकूण किरकोळ
एकूण किरकोळ हे प्रत्येक व्हेरिएंटचे प्रमाण आणि त्याच्या किरकोळ किमतीच्या गुणाकाराइतके असते. जर तुम्ही तुमचा सर्व स्टॉक त्याच्या सध्याच्या किमतीला विकला, तर तुम्ही एवढी कमाई कराल.
एकूण आयटम्स
एकूण आयटम म्हणजे तुमच्या स्टोअरमध्ये स्टॉकमध्ये असलेल्या आयटमची एकूण संख्या. तुमच्याकडे 10 लाल मोजे आणि 5 निळे मोजे असल्यास, एकूण आयटमची संख्या 15 असेल.
प्रत्येक विक्रेत्यानुसार उपलब्ध स्टॉक
Stocky प्रत्येक विक्रेत्यासाठी उपलब्ध स्टॉकचा रेकॉर्ड ठेवतो. एखाद्या विक्रेत्याचा उपलब्ध स्टॉक अॅक्सेस करण्यासाठी उपलब्ध स्टॉक अहवालाच्या सर्वात वरती असलेला फॉर्म वापरा. काही अहवालांमध्ये स्टॉक Shopify द्वारे ट्रॅक केलेले म्हणून सूचीबद्ध केलेला असू शकतो. Shopify द्वारे ट्रॅक केलेल्या आयटमनुसार तुमच्या उपलब्ध स्टॉकचे अहवाल विभाजित करण्याचा हा एक मार्ग आहे. तुमची ड्रॉप-शिप केलेली उत्पादने Shopify द्वारे ट्रॅक केली जात नसल्यास, प्रत्येक अहवालाची Shopify द्वारे ट्रॅक केलेले आवृत्ती निवडून उपलब्ध स्टॉक अहवालांमधून ड्रॉप-शिप केलेला स्टॉक वगळला जाऊ शकतो.
Stocky मधील राउंडिंग
विविध अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन सिस्टीम राउंडिंग वेगवेगळ्या प्रकारे हाताळतात. Stocky लाइन आयटम स्तरावरील संख्या दोन दशांश स्थळांपर्यंत राउंड करतो आणि त्यानंतर तुम्हाला एकूण संख्या देण्यासाठी लाइन आयटम्सची बेरीज करतो. बेरजेनंतर राउंडिंग करण्याच्या इतर पद्धतींच्या तुलनेत यामुळे थोडी तफावत निर्माण होऊ शकते.
तुम्हाला कोणतीही संख्या मॅन्युअली अॅडजस्ट करायची असल्यास, तुम्ही ती ॲडजस्टमेंट्स फील्डमध्ये करू शकता. तुमच्या पुरवठादाराची अकाउंटिंग सिस्टीम राउंडिंगसाठी वेगळा दृष्टीकोन वापरत असल्यास, अॅडजस्टमेंट करणे आवश्यक असू शकते.