Shopify POS इन्व्हेंटरी ट्रॅक आणि अॅडजस्ट करणे
Shopify POS मध्ये, तुम्ही तुमची इन्व्हेंटरी पाहू शकता आणि इन्व्हेंटरीचे प्रमाण अॅडजस्ट करण्यासाठी Quick counts POS UI एक्स्टेंशन वापरू शकता.
तुमच्या Shopify ॲडमिनमधील इन्व्हेंटरी पेजवर, तुम्ही तुमची इन्व्हेंटरी पाहू शकता, तुमची इन्व्हेंटरी मोजणी अॅडजस्ट करू शकता आणि इन्व्हेंटरी हस्तांतरण तयार करू शकता. ज्या उत्पादनांची आणि व्हेरिएंटची इन्व्हेंटरी Shopify द्वारे ट्रॅक केली जात आहे त्यांच्या साठा समायोजनाचा इतिहासदेखील तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील उत्पादनाच्या तपशील पेजवर इन्व्हेंटरी ट्रॅकिंग अॅक्टिव्हेट करू शकता.
तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये इन्व्हेंटरी कशी व्यवस्थापित करायची याबद्दल अधिक जाणून घ्या.
या पेजवर
Shopify POS मध्ये इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यासाठी आवश्यकता
तुमच्या सर्व रिटेल ठिकाणांवर इन्व्हेंटरी ट्रॅकिंग योग्यरीत्या कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी खालील आवश्यकतांचे पुनरावलोकन करा:
- तुमची उत्पादन इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यासाठी आणि Shopify POS वर ओव्हरसेलिंग टाळण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये इन्व्हेंटरी ट्रॅकिंग अॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक ठिकाणच्या स्टॉकवर लक्ष ठेवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमच्या ठिकाणांवर इन्व्हेंटरी असाइन करणे आवश्यक आहे.
Shopify POS इन्व्हेंटरी ट्रॅक करणे
तुम्ही Shopify POS मध्ये उत्पादने शोधू शकता आणि नंतर उत्पादन तपशील स्क्रीनवर इन्व्हेंटरी ट्रॅक करू शकता.
उत्पादन तपशील स्क्रीन खालील कॅटेगरीसाठी इन्व्हेंटरी प्रदर्शित करते:
- उपलब्ध
- कमिट केलेले (पूर्ण न झालेल्या ऑर्डर्समध्ये जोडलेली इन्व्हेंटरी)
- अनुपलब्ध
- इतर ठिकाणांहून येणारे
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये उत्पादन पेजवर इन्व्हेंटरीदेखील ट्रॅक करू शकता.
तुम्हाला स्टॉकची पातळी कमी असल्याची थेट नोटिफिकेशन्स प्राप्त करायची असल्यास, तुम्ही Shopify App Store मधून इन्व्हेंटरी अलर्ट अॅप इंस्टॉल करू शकता.
Shopify POS इन्व्हेंटरी अॅडजस्ट करणे
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील इन्व्हेंटरी पेजवर इन्व्हेंटरीचे प्रमाण अॅडजस्ट करू शकता. तसेच तुम्ही बल्क एडिटर किंवा CSV फाईल एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट वापरून बल्कमध्ये इन्व्हेंटरीचे प्रमाण अॅडजस्ट करू शकता.
थेट Shopify POS वर इन्व्हेंटरीचे प्रमाण अॅडजस्ट करण्यासाठी तुम्ही Quick count POS UI एक्स्टेंशन वापरू शकता.
तुमची रिटेल दुकाने बंद असताना आणि तुम्ही मोठे ऑनलाइन सेल्स इव्हेंट्स आयोजित करत नसताना तुमचे इन्व्हेंटरीचे प्रमाण अपडेट करण्याचा विचार करा. Shopify मध्ये तुमचे इन्व्हेंटरीचे प्रमाण अचूक असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमच्या इन्व्हेंटरीची प्रत्यक्ष मोजणी करू शकता आणि तो डेटा रेकॉर्ड करू शकता.
एकापेक्षा जास्त ठिकाणांवरील इन्व्हेंटरी व्यवस्थापित करणे
तुम्ही एकापेक्षा जास्त पत्त्यांवर Shopify POS वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify POS उपकरणामधून विक्रीचे ठिकाण निवडू शकता. उत्पादनाचा स्टॉक आहे की नाही, ते विकले गेले आहे किंवा अंशतः उपलब्ध आहे यासारखी तुमच्या उपकरणाच्या निवडलेल्या ठिकाणाची इन्व्हेंटरी माहिती Shopify POS प्रदर्शित करते.
योग्य कर लागू करण्यासाठी आणि ठिकाणानुसार ऑर्डर्स ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला अचूक ठिकाण निवडणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही Shopify POS वर एखादे उत्पादन विकता किंवा पुन्हा स्टॉक करता, तेव्हा त्या ठिकाणासाठी इन्व्हेंटरी मोजणी अपडेट होते.