Shopify अ‍ॅपमध्ये Quick Sale तयार करा

जलद व्यवहारांसाठी Quick Sale तयार करण्यासाठी तुम्ही Shopify अ‍ॅप वापरू शकता. संपूर्ण ड्राफ्ट ऑर्डर तयार न करता किंवा Shopify POS अ‍ॅप न वापरता जलद विक्री पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टोअरमधील उत्पादने जोडू शकता, कस्टम रकमा टाकू शकता आणि सवलती लागू करू शकता.

Shopify अ‍ॅपमध्ये Quick Sale तयार करताना विचारात घ्यायच्या बाबी

Shopify अ‍ॅपमध्ये Quick Sale तयार करण्यापूर्वी, खालील बाबींचे पुनरावलोकन करा.

उपलब्धता आणि पेमेंटसंबंधित आवश्यकता

  • Shopify कार्यरत असलेल्या सर्व देशांमध्ये Quick Sale उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही सपोर्टेड देशामध्ये पेमेंट लिंक्स किंवा रोख रक्कम वापरून पेमेंट्स स्वीकारू शकता.
  • Tap to Pay ही ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर (केवळ Android उपकरणे), स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये अतिरिक्त पेमेंट पद्धत म्हणून उपलब्ध आहे. Tap to Pay वापरण्यासाठी, तुम्ही Shopify अ‍ॅपमधील Tap to Pay च्या पात्रतेच्या आवश्यकतापूर्ण करणे आवश्यक आहे.
    • कॅनडामधील Quick Sales Interac पेमेंट्सना सपोर्ट करतात.
    • ऑस्ट्रेलियामधील Quick Sales EFTPOS पेमेंट्सना सपोर्ट करतात.
  • Quick Sale तयार करण्यासाठी, तुम्हाला Shopify प्लॅन आणि पेमेंट प्रदाता आवश्यक आहे. ज्या देशांमध्ये Shopify Payments उपलब्ध आहे, तिथे तुम्ही Shopify Payments वापरणे आवश्यक आहे. इतर देशांमध्ये, तुम्ही PayPal किंवा कोणताही सपोर्टेड पेमेंट प्रदाता वापरू शकता.

उपकरण अ‍ॅक्सेस आणि कर्मचारी परवानग्या

  • Quick Sale दरम्यान आयटम्स स्कॅन करण्यासाठी तुमच्या मोबाईल उपकरणाचा कॅमेरा वापरण्याकरिता, तुम्ही तुमच्या उपकरणाला कॅमेरा अ‍ॅक्सेसच्या परवानग्या प्रदान करणे आवश्यक आहे.
  • Quick Sale तयार करण्यासाठी आणि Tap to Pay द्वारे पेमेंट्स स्वीकारण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या भूमिकेचा भाग म्हणून Quick Sale परवानगी आवश्यक आहे.
  • Quick Sale दरम्यान तुमचे उपकरण हरवल्यास तुमचा Shopify ॲडमिन सुरक्षित ठेवण्यासाठी, Quick Sale मधून बाहेर पडण्यासाठी FaceID आवश्यक असण्याचा (Require FaceID to exit) पर्याय अ‍ॅक्टिव्हेट करा. बायोमेट्रिक्स वापरून Shopify अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्याविषयी अधिक जाणून घ्या.

सवलती आणि वैशिष्ट्यांच्या मर्यादा

  • Quick Sale वर लागू केलेल्या इतर सवलतींसोबत सवलती स्टॅक होतात आणि त्या लागू केल्या जातात त्या क्रमाने स्टॅक होतात. Quick Sale वर सवलती लागू करण्याविषयी अधिक जाणून घ्या.
  • Quick Sale सोप्या आणि जलद व्यवहारांवर केंद्रित असते आणि त्यामध्ये नियमित प्रत्यक्ष विक्रीसाठीची सखोल वैशिष्ट्ये नसतात, जसे की रोख ट्रॅकिंग किंवा ऑर्डरमधील केवळ विशिष्ट आयटम्ससाठी कर आकारणे, जे तुम्ही जेव्हा Shopify POS वापरून विक्री करतातेव्हा उपलब्ध असतात. याव्यतिरिक्त यामध्ये तुम्ही जेव्हा Shopify ॲडमिनमध्ये ड्राफ्ट ऑर्डर तयार करतातेव्हा मिळणाऱ्या खालील पर्यायांसारख्या तपशीलवार वैशिष्ट्यांचा अभाव असतो:
    • व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी ऑर्डरसोबत ग्राहक प्रोफाइल जोडणे.
    • ऑर्डरवर स्वयंचलित सवलती लागू करणे.
    • एखादे उत्पादन स्टॉकमध्ये नसताना किंवा जास्त विकले गेले असल्यास तुम्हाला सूचित करणे.
    • ऑर्डरमध्ये नंतर बदल करण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी ड्राफ्ट स्थितीमध्ये सेव्ह करणे.

Quick Sale सुरू करा

Shopify अ‍ॅपमध्ये Quick Sale सुरू करण्यासाठी, Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.

तुमच्या स्टोअरशी 1 पेक्षा जास्त ठिकाणे जोडलेली असल्यास, तुम्ही Quick Sale मधील इन्व्हेंटरी मेनू वापरून कोणत्या ठिकाणाहून विक्री करत आहात हे निवडू शकता. Quick Sale साठी निवडलेले ठिकाण हे व्यवहारादरम्यान तुम्ही विकत असलेल्या उत्पादनांवर आधारित तिची इन्व्हेंटरी प्रदर्शित आणि अपडेट होणारे ठिकाण असते. हे Quick Sale वर प्रदर्शित आणि लागू होणाऱ्या करांच्या दरांवर देखील परिणाम करते.

Quick Sale मध्ये विद्यमान उत्पादने जोडा

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील कोणतेही उत्पादन Quick Sale मध्ये जोडू शकता. तुम्ही Quick Sale दरम्यान आयटमची रक्कम अ‍ॅडजस्ट करू शकता किंवा विशिष्ट उत्पादन व्हेरिएंट्स निवडू शकता.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. उत्पादन जोडा वर टॅप करा.

  3. सर्व उत्पादने सूचीमध्ये, तुम्हाला Quick Sale मध्ये जोडायची असलेली उत्पादने निवडा:

    • तुम्हाला जोडायच्या असलेल्या आयटम्सची संख्या सानुकूलित करण्यासाठी उत्पादनाच्या बाजूला असलेल्या + आयकनवर टॅप करा. तुम्ही आयटम्सच्या संख्येवर टॅप करू शकता आणि ती संख्या व्यक्तिचलितपणे सानुकूलित देखील करू शकता.
    • Quick Sale मधून आयटम काढून टाकण्यासाठी Delete वर टॅप करा.
    • विशिष्ट उत्पादने शोधण्यासाठी सर्चबार वापरा.
    • तुम्हाला जे उत्पादन जोडायचे आहे त्याचा बारकोड स्कॅन करण्यासाठी तुमच्या उपकरणाचा कॅमेरा वापरण्याकरिता Scan barcode वर टॅप करा.
  4. निवडलेली उत्पादने Quick Sale मध्ये जोडण्यासाठी Done वर टॅप करा.

  5. पर्यायी: Quick Sale मध्ये उत्पादने जोडल्यानंतर, ती अपडेट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मधील कोणत्याही उत्पादनावर टॅप करू शकता:

    • तुम्हाला समाविष्ट करायच्या असलेल्या आयटम्सची संख्या सानुकूलित करण्यासाठी + किंवा - आयकन्सवर टॅप करा. तुम्ही आयटम्सच्या संख्येवर टॅप करू शकता आणि ती संख्या व्यक्तिचलितपणे सानुकूलित देखील करू शकता. त्यानंतर, बदल लागू करण्यासाठी Done वर टॅप करा.
    • Quick Sale मधून आयटम हटवण्यासाठी हटवा वर टॅप करा.

तुमच्या Quick Sale मध्ये कस्टम रकमा जोडा

तुम्ही Quick Sale मध्ये कितीही कस्टम रकमा जोडू शकता. एकवेळचे शुल्क जोडण्यासाठी किंवा तुम्ही नियमितपणे विकत नसलेला एखादा आयटम विकण्यासाठी कस्टम रक्कम जोडणे हा एक उपयुक्त मार्ग आहे.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. कस्टम रक्कम वर टॅप करा.

  3. तुम्हाला Quick Sale मध्ये जोडायची असलेली कस्टम रक्कम कॉनफिगर करा:

    • पर्यायी: कस्टम रक्कमेला नाव देण्यासाठी नाव फील्डवर टॅप करा. जर तुम्ही त्याला नाव दिले नाही, तर ते डीफॉल्टनुसार "कस्टम रक्कम" बनते.
    • कस्टम किंमत लागू करण्यासाठी किंमत फील्डवर टॅप करा.
  4. Quick Sale मध्ये कस्टम रक्कम जोडण्यासाठी जोडा वर टॅप करा.

  5. पर्यायी: Quick Sale मध्ये कस्टम रकमा जोडल्यानंतर, ते अपडेट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मधील कोणत्याही कस्टम रक्कमेवर टॅप करू शकता:

    • मूल्ये अपडेट करण्यासाठी नाव किंवा किंमत फील्ड्सवर टॅप करा. त्यानंतर, बदल लागू करण्यासाठी पूर्ण झाले वर टॅप करा.
    • Quick Sale मधून कस्टम रक्कम हटवण्यासाठी हटवा वर टॅप करा.

Quick Sale वर सवलत लागू करा

संपूर्ण Quick Sale वर लागू होणारी रक्कमेतील सूट किंवा टक्केवारी सवलती तुम्ही मॅन्युअली जोडू शकता. स्वयंचलित सवलती Quick Sale वर लागू होत नाहीत आणि तुम्ही सवलत कोड किंवा केवळ व्यवहारातील विशिष्ट लाइन आयटम्सवर लागू होणाऱ्या सवलतींसारख्या इतर प्रकारच्या सवलती लागू करू शकत नाही.

तुम्ही एका Quick Sale वर अनेक मॅन्युअल सवलती लागू करू शकता. तथापि, जेव्हा Quick Sale वर अनेक सवलती लागू केल्या जातात, तेव्हा त्या अनुक्रमे प्रोसेस केल्या जातात, याचा अर्थ मागील सवलत लागू केल्यानंतरच्या Quick Sale च्या किंमतीवर आधारित प्रत्येक सवलतीची गणना केली जाते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही $100 चा Quick Sale तयार केला आणि 10% सवलत व त्यानंतर $10-सूट सवलत लागू केली, तर अंतिम किंमत $80 असेल. याचे कारण वापरले जाणारे सूत्र (100 - 10%) - 10 = 80 हे असेल. तथापि, जर तुम्ही $10-सूट सवलत लागू केली आणि नंतर 10% सवलत (उलट क्रम) लागू केली, तर अंतिम किंमत $81 असेल, कारण 10% सवलत $10-सूट सवलत लागू करून मिळालेल्या नवीन $90 एकूण रक्कमेवर लागू होईल. यासाठी वापरले जाणारे सूत्र (100 - 10) - 10% = 81 असेल.

दुसऱ्या उदाहरणासाठी, Quick Sale वर 10% सवलत आणि त्यानंतर 20% सवलत लागू केल्याने एकच 30% सवलत लागू केल्याप्रमाणे अंतिम किंमत मिळत नाही. जर Quick Sale $100 चा असेल आणि नंतर 2 स्वतंत्र टक्केवारी सवलती लागू केल्या, तर अंतिम किंमत $72 असेल कारण (100 - 10%) - 20% = 72. $100 Quick Sale वरील एका 30% सवलतीमुळे अंतिम किंमत $70 होईल कारण 100 - 30% = 70.

Quick Sale वर सवलती लागू केल्यानंतर तुम्ही त्या पुन्हा क्रमाने लावू शकत नाही.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. More Actions वर टॅप करा आणि नंतर खालीलपैकी कोणतेही सवलत मॉडिफायर निवडा:

    • टक्केवारी सवलत लागू करण्यासाठी, % सवलत लागू करा वर टॅप करा.
    • रक्कमेतील सूट लागू करण्यासाठी, $ सवलत लागू करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला Quick Sale मध्ये जोडायची असलेली सवलत कॉनफिगर करा:

    • पर्यायी: सवलतीला नाव देण्यासाठी नाव फील्डवर टॅप करा. जर तुम्ही नाव प्रविष्ट केले नाही, तर ते डीफॉल्टनुसार "कस्टम रक्कम" बनते.
    • कस्टम रक्कमेतील सूट किंवा टक्केवारीचे मूल्य लागू करण्यासाठी सवलत फील्डवर टॅप करा.
  4. Quick Sale मध्ये सवलत जोडण्यासाठी जोडा वर टॅप करा.

  5. पर्यायी: Quick Sale मध्ये सवलत जोडल्यानंतर, ती अपडेट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मधील सवलतीवर टॅप करू शकता:

    • मूल्ये अपडेट करण्यासाठी नाव किंवा सवलत फील्डवर टॅप करा. त्यानंतर, बदल लागू करण्यासाठी पूर्ण झाले वर टॅप करा.
    • Quick Sale मधून सवलत हटवण्यासाठी हटवा वर टॅप करा.

Quick Sale मध्ये शिपिंग जोडा

जेव्हा ग्राहकाला आता पेमेंट करायचे असते, परंतु त्यांचे आयटम्स त्यांच्या पत्त्यावर शिप करायचे असतात तेव्हा तुम्ही Quick Sale मध्ये शिपिंग जोडू शकता. तुम्ही कस्टम शिपिंग दर तयार करू शकता किंवा तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुम्ही सेट केलेल्या शिपिंग वाहक आणि सेटिंग्ज वर आधारित उपलब्ध शिपिंग दरांमधून निवडू शकता.

जेव्हा तुम्ही शिपिंग जोडता, तेव्हा Quick Sale मध्ये एक शिपिंग लाइन आयटम जोडला जातो. तुम्ही शिपिंग पत्ता मॅन्युअली कॉनफिगर करू शकता आणि थेट Quick Sale मध्ये शिपिंग दर निवडू शकता किंवा तुम्ही शिपिंग तपशील रिक्त ठेवू शकता. जर तुम्ही शिपिंग तपशील रिक्त ठेवले, तर ऑर्डरच्या सारांशामधील शिपिंग शुल्क एक अद्याप गणना केली नाही असा मेसेज दाखवते. तुम्ही अद्याप गणना न केलेल्या शिपिंग तपशीलांसह तुमच्या ग्राहकाला एक पेमेंट लिंक पाठवू शकता आणि ऑनलाइन ऑर्डरसाठी असलेल्या Shopify Checkout अनुभवाप्रमाणेच ते स्वतःचे शिपिंग तपशील सबमिट करू शकतात व स्वतःच शिपिंग दर निवडू शकतात. जर तुम्ही पेमेंट लिंक पाठवण्यापूर्वी Quick Sale मध्ये शिपिंग तपशील मॅन्युअली कॉनफिगर केले, तर तुमचा ग्राहक पेमेंटदरम्यान मॅन्युअली शिपिंग दर निवडू शकणार नाही.

Quick Sale पूर्ण झाल्यानंतर आणि तुम्ही ग्राहकाला ऑर्डर शिप करण्यासाठी तयार झाल्यावर, तुम्ही ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या Shopify ॲडमिनच्या ऑर्डर्स पेजवरून ऑर्डर पूर्ण करू शकता. ऑर्डर्सची पूर्तता करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

Quick Sale मध्ये शिपिंग जोडण्यापूर्वी, खालील बाबींचे पुनरावलोकन करा:

  • जर तुम्ही Quick Sale मध्ये जोडलेला पत्ता तुमच्या सपोर्टेड शिपिंग झोनच्या बाहेर असेल, तर शिपिंग लाइन आयटमवर पत्ता झोनच्या बाहेर आहे अशी चेतावणी प्रदर्शित होते. तुम्ही तरीही Quick Sale पूर्ण करू शकता, परंतु कोणतेही वाहक-गणित (carrier-calculated) पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, तुम्ही एक कस्टम शिपिंग दर जोडला पाहिजे.
  • जर तुम्ही तुमच्या Quick Sale मध्ये एक कस्टम रक्कम जोडली, तर कस्टम रक्कम लाइन आयटमसाठी शिपिंग दर तुमच्या डिफॉल्ट पॅकेज सेटिंग्जवर आधारित मोजला जातो. योग्य शिपिंग रक्कम मॅन्युअली प्रविष्ट करण्यासाठी त्याऐवजी तुम्ही कस्टम दरदेखील जोडू शकता.
  • जर तुमचा ग्राहक त्यांच्या ऑर्डरसाठी रोख रक्कमेत किंवा Tap to Pay वापरून पेमेंट करणे निवडत असेल, तर तुम्ही शिपिंग पत्ता मॅन्युअली कॉनफिगर करणे आणि शिपिंग दर आगाऊ निवडणे आवश्यक आहे. रोख रक्कमेने किंवा Tap to Pay द्वारे पेमेंट करताना शिपिंग तपशील रिक्त ठेवता येत नाहीत.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. More Actions वर टॅप करा आणि त्यानंतर शिपिंग जोडा वर टॅप करा.

  3. पर्यायी: शिपिंग तपशील मॅन्युअली कॉनफिगर करण्यासाठी Quick Sale मधील शिपिंग लाइन आयटमवर टॅप करा:

    1. पत्ता टॅबमध्ये, पहिले व आडनाव, रस्त्याचा पत्ता आणि पोस्टल कोड यांसारखे शिपिंग पत्त्याचे तपशील जोडा. तुमच्या अस्तित्वात असलेल्या शिपिंग पर्यायांवर आधारित त्या पत्त्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त दरामध्ये शिपिंग दर अपडेट होतो.
    2. पर्यायी: पद्धत टॅबमध्ये, वाहक-गणित (carrier-calculated) शिपिंग दर निवडा किंवा कस्टम शिपिंग दर आणि कस्टम दराचे नाव जोडण्यासाठी कस्टम दर वर टॅप करा.
    3. पूर्ण झाले वर टॅप करा.
  4. पर्यायी: Quick Sale मध्ये शिपिंग जोडल्यानंतर, ते अपडेट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मधील शिपिंग लाइन आयटमवर टॅप करू शकता:

    • पत्ता किंवा शिपिंग पद्धतीचे तपशील अपडेट करण्यासाठी शिपिंग लाइन आयटमवर टॅप करा. त्यानंतर, बदल लागू करण्यासाठी पूर्ण झाले वर टॅप करा.
    • Quick Sale मधून शिपिंग लाइन आयटम हटवण्यासाठी पत्ता टॅबमध्ये, Delete आयकनवर टॅप करा.

तुमच्या Quick Sale वरील कर ॲक्टिव्हेट किंवा डीॲक्टिव्हेट करा

संपूर्ण Quick Sale वर लागू होणारे कर तुम्ही मॅन्युअली निवडू किंवा डीसिलेक्ट करू शकता. तुम्ही Quick Sale मधील विशिष्ट लाइन आयटमवर लागू होणारे कर व्यवस्थापित करू शकत नाही. Quick Sale मध्ये प्रदर्शित होणारे कर दर तुम्ही Quick Sale सुरू केल्यावर निवडलेले ठिकाण आणि तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये सेट केलेल्या कर सेटिंग्जवर आधारित निर्धारित केले जातात. तुम्ही Quick Sale मध्ये शिपिंग जोडले आहे की नाही, या आधारावर त्याची पुन्हा गणना केली जाते. Shopify वापरून कर आकारणी बद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या ग्राहकांना योग्य विक्री कर दर आकारत आहात आणि कर योग्यरित्या फाईल आणि रेमिट करत आहात याची खात्री करण्यासाठी नेहमी स्थानिक कर अधिकारी किंवा कर लेखापालांशी संपर्क साधा.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. तुमच्या Quick Sale मध्ये उत्पादने किंवा कस्टम रक्कम जोडा.

  3. Quick Sale सारांशामध्ये, कर च्या शेजारी असलेल्या संपादित करा वर टॅप करा आणि नंतर Quick Sale वरून कर दर लागू करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी त्यांपैकी कोणतेही निवडा किंवा डीसिलेक्ट करा.

Quick Sale मध्ये नोंद जोडा

विक्रीबद्दलचे विशिष्ट तपशील रेकॉर्ड करण्यासाठी किंवा ग्राहकाकडील विनंत्या समाविष्ट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मध्ये नोंद जोडू शकता. ग्राहकाला नोंदी दिसत नाहीत, त्यामुळे तुमच्या Shopify ॲडमिनमधून केवळ तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनाच नोंद ॲक्सेस करता येईल.

Quick Sale नोंदींना 5000 अक्षरांची मर्यादा असते.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. आणखी कृती > नोंद जोडा वर टॅप करा.

  3. नोंद संवाद बॉक्समध्ये, तुम्हाला नोंदीमध्ये समाविष्ट करायची असलेली सामग्री टाईप करा.

  4. Quick Sale मध्ये नोंद जोडण्यासाठी झाले वर टॅप करा.

  5. पर्यायी: Quick Sale मध्ये नोंद जोडल्यानंतर, ती अपडेट करण्यासाठी तुम्ही Quick Sale मधील नोंदीवर टॅप करू शकता:

    • सामग्री अपडेट करण्यासाठी नोंदीवर टॅप करा. त्यानंतर, बदल लागू करण्यासाठी झाले वर टॅप करा.
    • Quick Sale मधून नोंद काढून टाकण्यासाठी नोंद काढून टाका वर टॅप करा.

Quick Sale वरील कार्ट क्लिअर करा

Quick Sale ला रिकाम्या स्थितीत रीसेट करण्यासाठी तुम्ही कधीही प्रगतीपथावर असलेले कार्ट क्लिअर करू शकता. ही प्रक्रिया Quick Sale मधून सर्व उत्पादने, कस्टम रक्कम आणि सवलती किंवा नोंदी यांसारखे कोणतेही कार्ट मॉडिफायर काढून टाकते. क्लिअर केलेले कार्ट पूर्ववत करता येत नाही.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. तुमच्या Quick Sale मध्ये कोणतीही कस्टमायझेशन करा, जसे की तुमच्या Quick Sale मध्ये उत्पादने किंवा कस्टम रक्कम जोडणे.

  3. कार्ट क्लिअर करण्यासाठी, आणखी कृती > कार्ट क्लिअर करा वर टॅप करा.

  4. क्लिअर करा वर टॅप करून क्लिअर करण्याची पुष्टी करा.

तुमच्या Quick Sale वरील टिप्स ॲक्टिव्हेट किंवा डीॲक्टिव्हेट करा

पेमेंटवर प्रक्रिया करण्यापूर्वी तुम्ही ग्राहकासाठी Quick Sale मध्ये टिप समाविष्ट करण्याचा पर्याय ॲक्टिव्हेट किंवा डीॲक्टिव्हेट करू शकता. डीफॉल्टनुसार, टिप्स डीॲक्टिव्हेट असतात आणि Quick Sale तयार करताना बंद म्हणून प्रदर्शित होतात. तुम्ही Quick Sales साठी कधीही टिप्स ॲक्टिव्हेट करू शकता आणि तुम्ही सेटिंग डीॲक्टिव्हेट करत नाही तोपर्यंत टिपचा पर्याय भविष्यातील सर्व Quick Sales साठी ॲक्टिव्ह राहील.

टिप्स सेटिंग ॲक्टिव्ह असताना, पेमेंटदरम्यान ग्राहकाला प्रदर्शित होणाऱ्या 3 प्रीसेट टिपच्या टक्केवारीचे पर्याय तुम्ही सानुकूलित करू शकता. डीफॉल्टनुसार, प्रीसेट टिपचे पर्याय 15%, 18% आणि 20% आहेत. टिप सेटिंग्जमध्ये त्यांची कशी क्रमवारी लावली आहे यावर आधारित 3 कस्टम टिपच्या टक्केवारीचे पर्याय तुमच्या ग्राहकाला संख्यात्मक क्रमाने प्रदर्शित होतात आणि पेमेंटदरम्यान सर्वात कमी ते सर्वोच्च या क्रमाने स्वयंचलितपणे त्यांची पुन्हा क्रमवारी लागत नाही. उदाहरणार्थ, पर्याय 1 प्रथम प्रदर्शित होतो, पर्याय 2 दुसऱ्या क्रमांकावर प्रदर्शित होतो आणि पर्याय 3 तिसऱ्या क्रमांकावर प्रदर्शित होतो.

तुम्ही निवडलेल्या 3 प्रीसेट टक्केवारीच्या पर्यायांव्यतिरिक्त, पेमेंटदरम्यान ग्राहकाला पर्याय म्हणून कस्टम टिप आणि कोणतीही टिप नाही समाविष्ट करण्याचा पर्याय प्रदर्शित होतो. जेव्हा Quick Sale साठी टिप सेटिंग ॲक्टिव्ह असते तेव्हा हे अतिरिक्त पर्याय लपवता येत नाहीत.

पायऱ्या:

  1. Shopify अ‍ॅप मध्ये, Quick Sale सुरू करा:

    1. Menu वर टॅप करा आणि त्यानंतर मुख्य मेनूमध्ये Quick Sale वर टॅप करा.
    2. पर्यायी: Quick Sale साठी वेगळे ठिकाण निवडण्यासाठी इन्व्हेंटरी मेनूवर टॅप करा.
  2. आणखी कृती > टिप्स वर टॅप करा.

  3. तुमच्या ग्राहकासाठी टिप्स सेटिंग ॲक्टिव्हेट किंवा डीॲक्टिव्हेट करण्यासाठी टिप्स सुरू करा सेटिंगवर टॅप करा.

  4. पर्यायी: भिन्न प्रीसेट टिपिंग पर्याय वर टॅप करा आणि पेमेंटदरम्यान तुमच्या ग्राहकांना प्रदर्शित करण्यासाठी भिन्न टक्केवारी मूल्ये प्रविष्ट करा.

  5. तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी, झाले वर टॅप करा.