Shopify Flow मधील ट्रिगर्स समजून घेणे

ट्रिगर ही वर्कफ्लो सुरू करणारी इव्हेंट असते आणि ती वर्कफ्लोच्या अटींची माहिती देण्यासाठी वर्कफ्लोद्वारे वापरल्या जाणाऱ्या डेटाचा प्रारंभिक संच दर्शवते. मुळात, ही पहिली पायरी किंवा प्रेरक इव्हेंट आहे जी ऑटोमेशन सुरू करते.

प्रत्येक वर्कफ्लोमध्ये फक्त 1 ट्रिगर पायरी असू शकते.

तुमच्या वर्कफ्लोसाठी ट्रिगर निवडणे

तुमचा वर्कफ्लो सुरू करण्यासाठी निवडण्याकरिता बरेच वेगवेगळे ट्रिगर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्वात योग्य ट्रिगर निवडल्याने तुमचा वर्कफ्लो यशस्वीरीत्या रन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

वर्कफ्लो सुरू करताना कोणता ट्रिगर निवडायचा हे ठरवताना, तुम्हाला ज्या टास्कचे ऑटोमेशन वर्कफ्लोद्वारे करायचे आहे, त्यानुसार खालील बाबींचे पुनरावलोकन करा:

तुम्हाला वर्कफ्लो कधी सुरू करायचा आहे याचा विचार करा: इव्हेंट विरूद्ध शेड्युल

जवळपास सर्व वर्कफ्लो ट्रिगर्स तुमच्या स्टोअरमध्ये घडणाऱ्या विशिष्ट इव्हेंट्सवर आधारित असतात. या इव्हेंट्सचे कोणतेही निश्चित शेड्युल नसते आणि तुमच्या स्टोअरच्या ॲक्टिव्हिटीनुसार ते दिवसातून अनेक वेळा घडू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही साधारणपणे आठवड्यातील एकाच दिवशी तुमच्या सर्व ऑर्डर्सची पूर्तता करत असल्यास, ऑर्डरची पूर्तता केली ट्रिगरने सुरू होणारा वर्कफ्लो जवळजवळ एका आठवड्यासाठी अजिबात रन होणार नाही आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ऑर्डर्सची पूर्तता करायला सुरुवात कराल तेव्हा तो एकाच दिवसात अनेक वेळा रन होईल. अनेक टास्क्ससाठी, इव्हेंट-आधारित ट्रिगर्स हा योग्य पर्याय आहे, कारण ते केवळ संबंधित इव्हेंट घडल्यावरच रन होतात.

तथापि, तुम्हाला एखाद्या विशिष्ट इव्हेंटऐवजी सेट केलेल्या शेड्युलनुसार घडणाऱ्या टास्कचे ऑटोमेशन करायचे असू शकते. अशा बाबतीत, तुम्ही निर्धारित वेळ ट्रिगर वापरणे आवश्यक आहे, जो एक खास ट्रिगर आहे जो तुम्ही निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट वेळेत आणि तारखेला वर्कफ्लो सुरू करतो. तुम्ही दर तासाला, दररोज, साप्ताहिक किंवा मासिक रीतीने पुन्हा घडण्यासाठी वर्कफ्लो शेड्युल करू शकता. या प्रकारचा ट्रिगर शेड्युल-आधारित ऑटोमेशन्स सेट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, जसे की तुमच्या स्टॉकमध्ये नसलेल्या उत्पादनांची दैनंदिन सूची तयार करणे आणि तुमच्या इन्व्हेंटरी मॅनेजरला ईमेल पाठवणे.

हे का महत्त्वाचे आहे: तुमच्या वर्कफ्लोसाठी योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे ऑटोमेशन केवळ तुमच्या बिझनेसच्या गरजांशी संबंधित असल्यावरच ॲक्टिव्हेट होण्याची खात्री मिळते. तुम्ही इव्हेंट-आधारित ट्रिगर निवडल्यास, तुमचा वर्कफ्लो तुमच्या स्टोअरमधील ॲक्शनच्या थेट प्रतिसादात सुरू होतो, जसे की ग्राहकाने ऑर्डर देणे. तुम्ही शेड्युल केलेला ट्रिगर वापरल्यास, तुमचा वर्कफ्लो तुम्ही निवडलेल्या विशिष्ट वेळी रन होतो, ज्यामुळे नियमित अंतराने टास्क्सचे ऑटोमेशन करणे शक्य होते.

तुम्ही विचार करत असलेल्या ट्रिगरच्या व्याख्येची पुष्टी करा

Shopify Flow मध्ये, ट्रिगर्स खूप शब्दशः असतात आणि त्यांच्या व्याख्या काटेकोर असतात. उदाहरणार्थ, ऑर्डर तयार केली आणि ऑर्डरचा व्यवहार तयार केला हे ट्रिगर्स एकाच गोष्टीचा संदर्भ देत असल्याचे वाटू शकते, परंतु ते प्रत्यक्षात पूर्णपणे भिन्न ऑर्डर इव्हेंट्सचा संदर्भ देतात; जेव्हा तुमच्या स्टोअरमध्ये एखादी ऑर्डर तयार केली जाते तेव्हा ऑर्डर तयार केली ट्रिगर होतो, तर जेव्हा कोणत्याही विद्यमान ऑर्डरवर पेमेंट-संबंधित व्यवहार तयार केला जातो, जसे की न भरलेल्या ऑर्डरवर पेमेंट मॅन्युअली कॅप्चर करणे किंवा ग्राहकाला परतावा जारी करणे यांसारख्या गोष्टींवर ऑर्डरचा व्यवहार तयार केला ट्रिगर होतो.

हे का महत्त्वाचे आहे: वर्कफ्लोने त्याचा उर्वरित रन सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी तो ट्रिगर शोधतो, त्यामुळे योग्य ट्रिगर असल्यास, योग्य इव्हेंट घडल्यावर तुमचा वर्कफ्लो सुरू होईल याची खात्री होते. ट्रिगरचे नाव कशाचा संदर्भ देते याबद्दल गृहीतके बांधू नका. जर 2 ट्रिगर्स एकसारखे वाटत असतील, तर त्यांच्यात निश्चितपणे एक महत्त्वाचा फरक असतो जो तुमच्या वर्कफ्लोसाठी कोणता ट्रिगर वापरणे योग्य आहे यावर लक्षणीय प्रभाव टाकू शकतो.

वर्कफ्लोने कोणता डेटा तपासणे तुम्हाला आवश्यक आहे याचा विचार करा

ट्रिगर्स सुरुवातीचा डेटासेट निर्धारित करतात जो वर्कफ्लो त्याच्या अटी रन करताना वापरू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा वर्कफ्लो Customer created ट्रिगरसह सुरू होतो, तेव्हा वर्कफ्लोला नवीन ग्राहकाच्या माहितीचा ॲक्सेस असतो, जसे की ग्राहकाचे संपर्क तपशील, त्यांचा ऑर्डर इतिहास आणि त्यांनी ईमेलद्वारे मार्केटिंग साहित्य मिळवण्यास सहमती दिली आहे की नाही. तथापि, त्याला इतर प्रकारच्या डेटाचा ॲक्सेस असणार नाही, जसे की त्यांनी त्यांच्या सर्वात अलीकडील ऑर्डरसाठी निवडलेली शिपिंग पद्धत, कारण त्या प्रकारची माहिती ग्राहक डेटासेटच्या ऐवजी ऑर्डर डेटासेटमध्ये स्टोअर केली जाते.

वर्कफ्लोच्या उर्वरित भागामध्ये कोणत्या अटी, क्रिया आणि व्हेरिएबल्स वापरण्यासाठी उपलब्ध आहेत हे ट्रिगर्स थेट ठरवतात. एखादे व्हेरिएबल किंवा क्रिया उपलब्ध नसल्यास, ते निवडण्यासाठी पर्याय म्हणून दाखवले जाणार नाही.

ट्रिगर होतो तेव्हा काही डेटा त्वरित उपलब्ध होणार नाही याचा विचार करणे देखील योग्य आहे. उदाहरणार्थ, बऱ्याच प्रकरणांमध्ये, जर तुमचा वर्कफ्लो Order created ट्रिगरने सुरू होत असेल आणि तुमचा वर्कफ्लो order.fulfillmentOrders व्हेरिएबल वापरण्याचा प्रयत्न करत असेल, तर वर्कफ्लो कदाचित अयशस्वी होईल कारण ऑर्डरची अद्याप कोणतीही पूर्तता झालेली नाही, कारण ती नुकतीच तयार केली गेली होती. त्याऐवजी Fulfillment event created वापरण्यासाठी अधिक योग्य ट्रिगर असू शकतो.

हे का महत्त्वाचे आहे: ट्रिगरमधून उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित वर्कफ्लो यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकतात. वर्कफ्लोच्या अटी आणि क्रियांना रिव्ह्यूसाठी तुमच्या स्टोअरमधील कोणते तपशील ॲक्सेसिबल आहेत हे तुम्ही निवडलेला ट्रिगर निर्धारित करतो. तुम्हाला आवश्यक असलेला डेटा ट्रिगरच्या डेटासेटमध्ये नसल्यास, तुमचा वर्कफ्लो ऑटोमेशन किंवा निर्णय घेण्याकरिता ती माहिती ॲक्सेस करू किंवा वापरू शकत नाही. तुमचा वर्कफ्लो अंतिम करण्यापूर्वी, ट्रिगर तुमची ऑटोमेशन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देतो याची खात्री करा.

सामान्य वर्कफ्लोसाठी वापरल्या जाणार्‍या ट्रिगर्सची उदाहरणे

खालील टेबलमध्ये सामान्य ट्रिगर्सची उदाहरणे आणि तुम्ही त्यांचा Shopify Flow वर्कफ्लोमध्ये कसा वापर करू शकता याविषयी माहिती दिली आहे.

तुम्ही टेम्पलेट्स म्हणून उपलब्ध असलेल्या Shopify Flow मधील वर्कफ्लोच्या इतर उदाहरणांचा रिव्ह्यू देखील करू शकता.

काही सामान्य Shopify Flow ट्रिगर्स आणि ते वापरणाऱ्या वर्कफ्लोचे प्रकार सूचीबद्ध करणारे टेबल.
ट्रिगरउदाहरण वर्कफ्लोचे युज केसेस
ऑर्डर तयार केली
  • VIP ग्राहकांना टॅग करा
  • उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स फ्लॅग करा
  • पूर्तता रूट करा
ऑर्डरचे पेमेंट केले
  • विशिष्ट पेमेंट्स कॅप्चर करा
  • पुष्टी पाठवा
  • बाह्य सिस्टीम्स अपडेट करा
उत्पादन व्हेरिएंट इन्व्हेंटरीचे प्रमाण बदलले
  • कमी स्टॉकचा अलर्ट पाठवा
उत्पादन तयार केले
  • नवीन उत्पादने ऑटो-टॅग करा
  • विक्री चॅनेल्सवर नवीन उत्पादने प्रकाशित करा
ग्राहक तयार केला
  • सेगमेंट्समध्ये ग्राहकाला जोडा
  • स्वागत संदेश पाठवा
शेड्यूल केलेली वेळ
  • दैनिक विक्री अहवाल पाठवा
  • साप्ताहिक इन्व्हेंटरी चेक तयार करा
  • मासिक क्लीन-अप कार्ये करा