Shopify Flow मध्ये मॅन्युअली वर्कफ्लो रन करणे

Shopify ॲडमिनमधून स्वतंत्र ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, ग्राहक किंवा उत्पादनांवर वर्कफ्लो मॅन्युअली रन केले जाऊ शकतात. तुम्ही बल्क कृती सह एकाच वेळी अनेक ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, ग्राहक किंवा उत्पादनांवरही वर्कफ्लो रन करू शकता. वर्कफ्लो मॅन्युअली रन केल्यामुळे वर्कफ्लो ट्रिगर करणारा इव्हेंट आधीच घडला असला तरीही त्याचा वापर करता येतो.

मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी विचारात घेण्यासारख्या बाबी

तुम्ही Shopify ॲडमिनमधून वर्कफ्लो रन करण्यापूर्वी, खालील बाबींचे पुनरावलोकन करा:

  • निष्क्रिय वर्कफ्लो मॅन्युअली रन केले जाऊ शकत नाहीत. Shopify ॲडमिनमध्ये वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लो अ‍ॅक्टिव्हेट केलेला असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला रन करायचा असलेला वर्कफ्लो निष्क्रिय असेल, तर वर्कफ्लोवर जा आणि सुरू करा वर क्लिक करा.
  • मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी स्टोअरमध्ये Shopify Flow अ‍ॅप इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
  • ऑर्डर, ड्राफ्ट ऑर्डर, ग्राहक किंवा उत्पादनावर वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लोमध्ये जुळणारा ट्रिगर असणे आवश्यक आहे:
    • एखाद्या ऑर्डरवर मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लोने ऑर्डर तयार केली, ऑर्डर हटवली किंवा ऑर्डरचे पेमेंट केले ट्रिगर वापरणे आवश्यक आहे.
    • एखाद्या ड्राफ्ट ऑर्डरवर मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लोने ड्राफ्ट ऑर्डर तयार केली किंवा ड्राफ्ट ऑर्डर हटवली ट्रिगर वापरणे आवश्यक आहे.
    • एखाद्या ग्राहकावर मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लोने ग्राहक तयार केला, ग्राहक हटवला, ग्राहक सक्षम केला किंवा ग्राहक अक्षम केला ट्रिगर वापरणे आवश्यक आहे.
    • एखाद्या उत्पादनावर मॅन्युअली वर्कफ्लो रन करण्यासाठी, वर्कफ्लोने उत्पादन तयार केले ट्रिगर वापरणे आवश्यक आहे.
  • बल्क कृती शॉपमधील सर्व संसाधनांवर रन करण्याला सपोर्ट करत नाही.
  • बाय डीफॉल्ट, संसाधन सूची 50 पर्यंत परिणाम प्रदर्शित करतात. तुम्ही 250 पर्यंत परिणाम प्रदर्शित करण्यासाठी पेज URL च्या शेवटी ?limit=250 जोडू शकता, जे नंतर Flow ला पाठवले जाऊ शकतात. URL मध्ये ॲम्परसँड वापरून ?limit=250 इतर फिल्टर्ससोबत एकत्रित केले जाऊ शकते, जसे की &product_type=example किंवा &vendor=example, परंतु ?limit=250 प्रथम घोषित करणे आवश्यक आहे.

Shopify ॲडमिनमधून वर्कफ्लो रन करा

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये एखाद्या विशिष्ट ऑर्डर, ड्राफ्ट ऑर्डर, उत्पादन किंवा ग्राहकावर मॅन्युअली वर्कफ्लो रन करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, उत्पादने किंवा ग्राहक वर जा.
  2. ज्यावर वर्कफ्लो रन करायचा आहे त्या ऑर्डर, ड्राफ्ट ऑर्डर, ग्राहक किंवा उत्पादनावर क्लिक करा.
  3. ऑर्डर, ड्राफ्ट ऑर्डर, ग्राहक किंवा उत्पादन पेजवर, अधिक कृती वर क्लिक करा.
  4. Flow ऑटोमेशन रन करा वर क्लिक करा.
  5. Flow सह ऑटोमेट करा पेजवर, रन करण्यासाठी वर्कफ्लो निवडा.
  6. वर्कफ्लो रन करा वर क्लिक करा.
  7. पर्यायी: अ‍ॅक्टिव्हिटी पेजवर वर्कफ्लोच्या परिणामांचे पुनरावलोकन करण्यासाठी Flow मध्ये परिणाम पहा वर क्लिक करा.

बल्क कृतीसह वर्कफ्लो रन करा

वर्कफ्लो जास्तीत जास्त 50 ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, ग्राहक किंवा उत्पादनांवर मॅन्युअली रन केले जाऊ शकतात. वर्कफ्लोद्वारे प्रभावित होणारी प्रत्येक गोष्ट Shopify ॲडमिनमध्ये एकाच पेजवर उपस्थित असणे आवश्यक आहे.

तुम्हाला ज्या ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, ग्राहक किंवा उत्पादनांवर प्रभाव पाडायचा आहे ते एकाच पेजवर नसल्यास, तुमचे परिणाम फिल्टर करा. तुम्ही 250 पर्यंत परिणाम प्रदर्शित करण्यासाठी पेज URL च्या शेवटी पर्यायीरीत्या ?limit=250 जोडू शकता, जे नंतर Flow ला पाठवले जाऊ शकतात. URL मध्ये ॲम्परसँड वापरून ?limit=250 इतर फिल्टर्ससोबत एकत्रित केले जाऊ शकते, जसे की &product_type=example किंवा &vendor=example, परंतु ?limit=250 प्रथम घोषित करणे आवश्यक आहे.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, उत्पादने किंवा ग्राहक वर जा.
  2. वर्कफ्लो रन करण्यासाठी ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स, उत्पादने किंवा ग्राहक निवडा.
  3. ... बटणावर क्लिक करा.
  4. अ‍ॅप्स विभागामध्ये, Flow ऑटोमेशन रन करा वर क्लिक करा.
  5. Flow सह ऑटोमेट करा पेजवर, रन करण्यासाठी वर्कफ्लो निवडा.
  6. वर्कफ्लो रन करा वर क्लिक करा.
  7. पर्यायी: अ‍ॅक्टिव्हिटी पेजवर वर्कफ्लोच्या परिणामांचे पुनरावलोकन करण्यासाठी Flow मध्ये परिणाम पहा वर क्लिक करा.