Shopify Flow मध्ये वर्कफ्लो आयोजित करणे आणि शोधणे
तुम्ही टॅग्स आणि वर्णनात्मक नावे वापरून तुमचे Shopify Flow वर्कफ्लो आयोजित करू शकता. जसजसा तुमचा व्यवसाय वाढेल, तसतसे यामुळे तुमचे ऑटोमेशन्स व्यवस्थापित करणे, त्यांचे गट करणे आणि ते शोधणे सोपे होते. तुमची वर्कफ्लो सूची झटपट अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमचे वर्कफ्लो शोधू शकता आणि त्यांना फिल्टरही करू शकता.
या पेजवर
Shopify Flow मधील तुमच्या वर्कफ्लोसाठी टॅग्स तयार करा
तुम्ही कोणत्याही Shopify Flow वर्कफ्लोमध्ये टॅग्स तयार करू शकता. तुम्ही टॅग तयार करता, तेव्हा तो आपोआप सद्य वर्कफ्लोवर लागू होतो.
तुम्हाला तुमची वर्कफ्लो सूची फिल्टर करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही इतर वर्कफ्लोंना टॅग लागू करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही ब्लॅक फ्रायडे सायबर मंडे (BFCM) साठी वर्कफ्लो तयार केले, तर तुम्ही BFCM टॅग तयार करू शकता आणि BFCM संपल्यावर ते झटपट शोधण्यासाठी आणि निष्क्रिय करण्यासाठी सर्व संबंधित वर्कफ्लोंना लागू करू शकता.
टॅग उपलब्ध ठेवण्यासाठी तुम्हाला तो किमान 1 वर्कफ्लोवर लागू करणे आवश्यक आहे. तुम्ही सर्व वर्कफ्लोंवरून टॅग हटवल्यास, तो टॅग आपोआप हटवला जातो.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Flow वर जा.
तुम्हाला ज्या वर्कफ्लोसाठी टॅग तयार करायचा आहे, त्यावर क्लिक करा.
आणखी कृती > टॅग्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
टॅग्स जोडा फील्डमध्ये, तुम्हाला तयार करायचा असलेला टॅग एंटर करा आणि नंतर जोडा वर क्लिक करा.
ऐच्छिक: तुम्हाला एकाधिक नवीन टॅग्स तयार करायचे असल्यास, तुम्हाला तयार करायचा असलेला पुढील टॅग एंटर करा आणि नंतर जोडा वर क्लिक करा. तुम्हाला तयार करायच्या असलेल्या सर्व टॅग्ससाठी याची पुनरावृत्ती करा.
Shopify Flow मध्ये वर्कफ्लोवरील टॅग्स लागू करा किंवा हटवा
तुम्ही Shopify Flow मधील वर्कफ्लोवर विद्यमान टॅग्स लागू करू किंवा हटवू शकता.
टॅग उपलब्ध ठेवण्यासाठी तुम्हाला तो किमान 1 वर्कफ्लोवर लागू करणे आवश्यक आहे. तुम्ही सर्व वर्कफ्लोंवरून टॅग हटवल्यास, तो टॅग आपोआप हटवला जातो.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Flow वर जा.
तुम्हाला ज्या वर्कफ्लोसाठी टॅग्स व्यवस्थापित करायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
आणखी कृती > टॅग्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
टॅग्स व्यवस्थापित करा डायलॉगमध्ये, खालीलपैकी कोणतीही कृती करा:
- ऐच्छिक: नवीन टॅग तयार करण्यासाठी, टॅग्स जोडा फील्डमध्ये नवीन टॅग एंटर करा.
- वर्कफ्लोवर विद्यमान टॅग लागू करण्यासाठी, उपलब्ध सूचीमधून कोणताही टॅग निवडा.
- वर्कफ्लोमधून टॅग हटवण्यासाठी, निवडलेले सूचीमधील कोणताही टॅग डिसीलेक्ट करा.
Shopify Flow मध्ये तुमची वर्कफ्लो सूची शोधा
तुमच्या व्ह्यूमध्ये समाविष्ट असलेल्या आयटम्सना रिफाइन करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही वर्कफ्लोच्या नावातील घटकांशी मिळत्याजुळत्या कीवर्ड्सचा वापर करून तुमची वर्कफ्लो सूची शोधू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Flow वर जा.
आयकनवर क्लिक करा.
शोध बारमध्ये, तुमच्या वर्कफ्लोच्या नावाचे कीवर्ड्स टाईप करा.
ऐच्छिक: तुमचे परिणाम आणखी रिफाइन करण्यासाठी तुमच्या वर्कफ्लो शोधावर फिल्टर्स लागू करा.
Shopify Flow मध्ये तुमच्या वर्कफ्लो सूचीवर फिल्टर्स लागू करा
तुमच्या व्ह्यूमध्ये समाविष्ट असलेल्या आयटम्सना रिफाइन करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही तुमची वर्कफ्लो सूची फिल्टर करू शकता. Shopify Flow खालील प्रकारच्या फिल्टर्सना सपोर्ट करते:
- टॅग्स: तुम्ही तयार केलेल्या टॅग्सद्वारे तुमची वर्कफ्लो सूची फिल्टर करा.
- सक्रीयकरण स्थिती: वर्कफ्लोच्या स्थितीनुसार, जसे की सक्रीय किंवा निष्क्रिय द्वारे तुमची वर्कफ्लो सूची फिल्टर करा.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Flow वर जा.
आयकनवर क्लिक करा.
फिल्टर जोडा + वर क्लिक करा.
तुम्हाला वापरायचा असलेला फिल्टर प्रकार निवडा आणि नंतर तुम्हाला फिल्टर करायचे असलेले मूल्य निवडा.
ऐच्छिक: तुमच्या व्ह्यूवर एकाधिक फिल्टर्स लागू करण्यासाठी फिल्टरच्या श्रेणी आणि मूल्ये निवडणे सुरू ठेवा.
ऐच्छिक: फिल्टर केलेल्या परिणामांमध्ये शोधण्यासाठी, वर्कफ्लोच्या नावाचे काही कीवर्ड्स समाविष्ट करा.