EU कर सेट करणे
जर तुम्ही Shopify वर नवीन असाल, तर विक्री सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला कर आकारायचा की नाही हे ठरवावे लागेल. तुम्हाला विविध VAT सदस्य देशांमध्ये नोंदणी करावी लागू शकते. त्यानंतर, तुम्ही युरोपियन युनियनमध्ये जिथे कुठे विक्री करता तिथे तुम्ही योग्य दर आकारता याची खात्री करण्यासाठी Shopify मध्ये तुमचे कर सेट करू शकता.
Shopify मध्ये EU कर सेट करणे सुरू करण्यापूर्वी
तुम्ही कर आकारायचा की नाही हे तुम्हाला ठरवावे लागेल. जर तुम्हाला खात्री नसेल, तर स्थानिक कर अधिकारी किंवा कर व्यावसायिकाचा सल्ला घ्या. सामान्यतः, जर तुम्हाला EU मधील इतर देशांमध्ये विक्री करायची असेल, तर तुम्हाला VAT आकारण्यासाठी तुमच्या स्वतःच्या देशातील कर अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागेल.
जर तुम्ही EU मधील दुसऱ्या देशामध्ये विक्रीची ठरावीक मर्यादा ओलांडली, किंवा तिथे तुमचा लक्षणीय व्यवसाय उपस्थित असेल, तर तुम्हाला वन स्टॉप शॉप (OSS) योजनेसाठी नोंदणी करावी लागू शकते, किंवा संबंधित प्रत्येक एजन्सीशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांच्याकडे नोंदणी करावी लागेल. तुमचा व्यवसाय कुठे आहे आणि तुम्ही कुठे विक्री करता, आणि वैयक्तिक सरकारी आवश्यकतांवरून ही प्रक्रिया बदलते. तुम्ही VAT गोळा करण्यासाठी कुठे नोंदणीकृत आहात यावरून तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकारलेले दर ठरतात.
- तुमच्या स्वतःच्या देशातील ग्राहकांसाठी, तुमचा स्थानिक VAT दर आकारला जातो.
- तुमच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर EU देशांमधील ग्राहकांसाठी, तुम्ही €10,000 EUR ची नोंदणी मर्यादा ओलांडता की नाही यावर दर ठरवला जातो.
- जर तुम्ही ही मर्यादा ओलांडली नाही, तर तुमचा स्थानिक VAT दर आकारला जातो.
- तुम्ही मर्यादा ओलांडल्यास, तुमच्या ग्राहकाच्या देशाचा VAT दर आकारला जातो. गंतव्यस्थानाच्या देशाचा VAT दर आकारण्यासाठी, तुम्हाला वन स्टॉप शॉप (OSS) कडे किंवा त्या देशात VAT क्रमांकासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
जर तुमचे एखाद्या देशात लक्षणीय अस्तित्व असेल, तर तुम्हाला कर गोळा करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी तुम्ही त्या देशाच्या कर प्राधिकरणाशी संपर्क साधावा. तुमचा व्यवसाय VAT नोंदणीची मर्यादा ओलांडतो की नाही हे ठरवणे ही तुमची जबाबदारी आहे.
OSS सह VAT आकारा
वन स्टॉप शॉप योजना, ज्याला युनियन OSS देखील म्हटले जाते, ही अशा EU मधील ठिकाणी असणाऱ्या मर्चंट्ससाठी आहे ज्यांच्या इतर EU सदस्य देशांमधील विक्रीमुळे त्यांना गंतव्यस्थान देशांवर आधारित VAT आकारणे आणि रेमिट करणे आवश्यक असते. उत्तर आयर्लंडच्या दुहेरी दर्जामुळे, उत्तर आयर्लंडमधील ठिकाणी असलेले मर्चंट्सदेखील OSS वापरू शकतात.
जर तुमची इतर सर्व EU सदस्य देशांमधील वार्षिक विक्री €10,000 EUR पेक्षा कमी असेल, तर तुम्ही तुमचा स्थानिक VAT दर आकारण्यासाठी सूक्ष्म-व्यवसाय (मायक्रो-बिझनेस) सूट वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या ठिकाणावर आधारित VAT आकारायचा असेल, तर OSS साठी नोंदणी करू शकता.
जर तुमचे स्टोअर तुमची कर सेवा म्हणून Shopify Tax किंवा बेसिक टॅक्स वापरत असेल, तरच तुम्ही OSS वापरू शकता. जर तुम्ही EU मध्ये तुमच्या कर गणनेसाठी यापैकी कोणतीही सेवा वापरत नसाल, तर मॅन्युअल कर दर वापरून तुमचे कर दर मॅन्युअली अपडेट करा.
तुमच्या VAT नोंदणी सेट करणे
तुम्ही VAT सदस्य देशांसोबत नोंदणी केल्यानंतर आणि तुम्हाला तुमचा EU VAT क्रमांक मिळाल्यानंतर, तुम्ही तुमचे कर सेट करू शकता. Shopify योग्य VAT गोळा करू शकेल, सुसंगत VAT इन्व्हॉइसेस जनरेट करू शकेल आणि तुम्हाला तुमच्या कर दायित्वांविषयी अधिक अचूकपणे माहिती देऊ शकेल, याची खात्री करण्यासाठी तुमच्या VAT नोंदणी अप टू डेट ठेवा. तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तुमची VAT नोंदणी कशी एंटर करायची हे ठरवा:
- जर तुम्ही VAT आकारण्यासाठी विशिष्ट देशांसोबत नोंदणीकृत असाल, तर स्थानिक VAT नोंदणी सेट करा.
- जर तुम्ही तुमच्या देशाबाहेर विक्री करत असाल, तुम्ही OSS योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि तुमची EU सदस्य देशांमधील ग्राहकांना होणाऱ्या सर्व विक्रीसाठी एकच VAT रिटर्न सबमिट करण्याची योजना असेल, तर OSS VAT नोंदणी सेट करा.
- जर तुम्ही तुमच्या देशाबाहेर एकूण €10,000 EUR किंवा त्यापेक्षा कमी रकमेची विक्री करत असाल आणि तुमची तुमच्या स्थानिक कर प्राधिकरणाकडे VAT रिटर्न सबमिट करण्याची योजना असेल, तर सूक्ष्म-व्यवसाय (मायक्रो-बिझनेस) VAT नोंदणी सेट करा.
Shopify च्या कर नोंदणी VAT कसे गोळा करतात याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, EU आणि युनायटेड किंगडममधील कर नोंदणी वर्तनांचा संदर्भ घ्या.
स्थानिक VAT नोंदणी सेट करा
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > कर आणि शुल्क वर जा.
प्रादेशिक सेटिंग्ज विभागामध्ये, युरोपियन युनियन वर क्लिक करा.
EU देशामध्ये VAT गोळा करा विभागामध्ये, VAT गोळा करा वर क्लिक करा.
ज्या देशामध्ये तुमची VAT नोंदणी आहे तो देश निवडा आणि त्यानंतर तुमचा VAT क्रमांक एंटर करा.
VAT गोळा करा वर क्लिक करा.
पर्यायी: जर तुम्ही अतिरिक्त देशांमध्ये VAT गोळा करण्यासाठी नोंदणीकृत असाल, तर अतिरिक्त VAT क्रमांक जोडण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गोळा करा वर क्लिक करा.
OSS VAT नोंदणी सेट करा
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > कर आणि शुल्क वर जा.
प्रादेशिक सेटिंग्ज विभागामध्ये, युरोपियन युनियन वर क्लिक करा.
क्रॉस-बॉर्डर VAT गोळा करा विभागामध्ये, VAT गोळा करा वर क्लिक करा.
वन स्टॉप शॉप (OSS) नोंदणी वापरून गोळा करा निवडा.
ज्या देशामध्ये तुमची OSS नोंदणी आहे तो देश निवडा आणि त्यानंतर तुमचा VAT क्रमांक एंटर करा.
VAT गोळा करा वर क्लिक करा.
सूक्ष्म-व्यवसाय VAT नोंदणी सेट करा
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > कर आणि शुल्क वर जा.
प्रादेशिक सेटिंग्ज विभागामध्ये, युरोपियन युनियन वर क्लिक करा.
क्रॉस-बॉर्डर VAT गोळा करा विभागामध्ये, VAT गोळा करा वर क्लिक करा.
तुमच्या स्वतःच्या देशातील नोंदणी वापरून गोळा करा निवडा.
तुम्ही ज्या देशात नोंदणीकृत आहात तो देश निवडा आणि त्यानंतर तुमचा VAT क्रमांक एंटर करा.
VAT गोळा करा वर क्लिक करा.