स्टोअर्स तयार करणे

तुमचे स्टोअर किंवा संस्था Shopify Plus व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या किंमत योजनेवर असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिन सेटिंग्जच्या संस्था पेजवरून तुमच्या संस्थेमध्ये नवीन स्टोअर तयार करू शकता.

वापरकर्ता परवानगीची आवश्यकता

खालील वापरकर्ते संस्थेमध्ये स्टोअर्स तयार करू शकतात:

नवीन स्टोअर तयार करा

संस्थेमध्ये नवीन स्टोअर तयार करण्यासाठी, तुमच्याकडे आवश्यक वापरकर्ता परवानग्या असणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये स्टोअर तयार करता, तेव्हा तुम्ही नवीन स्टोअरचे मालक बनता. नवीन स्टोअर तयार केल्यानंतर तुम्ही स्टोअर मालक बदलू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > संस्था वर जा.

  2. स्टोअर तयार करा वर क्लिक करा.

  3. सेटअप फॉर्ममधील प्रश्नांची उत्तरे भरा. ही पायरी वगळण्यासाठी तुम्ही मला सेट अप करण्यासाठी मदत नको आहे वरही क्लिक करू शकता.

  4. प्लॅन निवडा किंवा वगळा, मी नंतर ठरवेन वर क्लिक करा.

तुम्ही आता स्टोअरमध्ये लॉग इन करू शकता आणि तपशील जोडणे सुरू करू शकता.

स्टोअर-विशिष्ट सेटिंग्ज कॉन्फिगर करणे

विशिष्ट स्टोअरसाठी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्यासाठी (जसे की त्याचे पेमेंट प्रदाते किंवा शिपिंग सेटिंग्ज), त्या स्टोअरचे Shopify ॲडमिन वापरा.

स्टोअर ॲक्सेस करणे

जर तुम्ही संस्था मालक असाल किंवा संस्था प्रशासक भूमिका असलेले वापरकर्ता असाल आणि तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणीतरी त्या संस्थेमध्ये स्टोअर तयार केले, तर ते तयार झाल्यानंतर तुम्हाला थेट ते स्टोअर ॲक्सेस करता येणार नाही. विशिष्ट स्टोअर ॲक्सेस करण्यासाठी, तुम्हाला प्रथम ॲक्सेस असलेल्या संस्थेतील स्टोअरच्या संस्था पेजवर जावे लागेल आणि त्यानंतर नवीन स्टोअर निवडावे लागेल.

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिन सेटिंग्जच्या संस्था पेजवरून नवीन स्टोअर ॲक्सेस केल्यानंतर, तुम्ही नेहमीप्रमाणे स्टोअर ॲक्सेस करू शकता.

पायऱ्या:

  1. तुम्हाला आधीपासूनच ॲक्सेस असलेल्या संस्थेतील एका स्टोअरच्या Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करा.
  2. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > संस्था वर जा.
  3. स्टोअर्स विभागात, तुम्हाला ॲक्सेस करायच्या असलेल्या स्टोअरच्या नावावर क्लिक करा.

स्टोअर तयार करण्याविषयी ट्रबलशूटिंग

संस्थेमध्ये स्टोअर तयार करताना तुम्हाला समस्या आल्यास, खालील सामान्य समस्या आणि उपायांचे पुनरावलोकन करा.

गहाळ असलेल्या स्टोअर तयार करा पर्यायाचे ट्रबलशूटिंग करा

तुम्हाला स्टोअर तयार करा पर्याय सापडत नसल्यास, खालील घटकांची पडताळणी करा:

  • स्टोअर्स तयार करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक वापरकर्ता परवानग्या असल्याची खात्री करा.
  • तुम्ही सर्वसाधारण सेटिंग्ज पेज नाही, तर संस्था सेटिंग्ज पेज पाहत आहात याची खात्री करा.
  • तुमचे स्टोअर प्रत्यक्षात एखाद्या संस्थेचा भाग आहे का ते तपासा. संस्था तयार करण्यासाठी स्टँडअलोन स्टोअर्सना प्रथम दुसऱ्या स्टोअरसोबत गट करणे आवश्यक आहे.

तुमच्या परवानग्यांची पडताळणी करण्यासाठी:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > वापरकर्ते आणि परवानग्या वर जा.
  2. तुमच्या खात्याला संस्था प्रशासक भूमिका किंवा स्टोअर्स संस्था परवानगी असल्याची खात्री करा.
व्यवसाय घटक निवडण्याच्या त्रुटींचे ट्रबलशूटिंग करा

स्टोअर तयार करताना व्यवसाय घटक निवडताना तुम्हाला एरर आल्यास:

तुमच्या वापरकर्ता भूमिकेला व्यवसाय घटकांसाठी पहा (View) परवानगी नसू शकते.

ही समस्या सोडवण्यासाठी:

  1. तुमच्या संस्था मालकाशी किंवा संस्था प्रशासकाशी संपर्क साधा.
  2. त्यांना तुमच्या भूमिकेमध्ये व्यवसाय घटकांसाठी पहा (View) परवानगी जोडण्याची विनंती करा.
  3. परवानगी दिल्यानंतर, स्टोअर पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय घटकांच्या परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

नव्याने तयार केलेले स्टोअर ॲक्सेस करण्याविषयी ट्रबलशूटिंग करा

तुमच्या संस्थेतील दुसर्‍या वापरकर्त्याने तयार केलेले स्टोअर तुम्ही ॲक्सेस करू शकत नसल्यास:

हे अपेक्षित वर्तन आहे. इतर वापरकर्त्यांनी तयार केलेल्या नवीन स्टोअर्सचा ॲक्सेस संस्था मालक आणि प्रशासकांनाही आपोआप मिळत नाही.

ॲक्सेस मिळवण्यासाठी:

  1. तुम्हाला आधीपासून ॲक्सेस असलेल्या संस्थेतील स्टोअरच्या Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करा.
  2. सेटिंग्ज > संस्था वर जा.
  3. स्टोअर्स विभागात, नवीन स्टोअरच्या नावावर क्लिक करा.
  4. तुम्ही या प्रकारे स्टोअर एकदा ॲक्सेस केल्यानंतर, तुम्ही भविष्यातील सत्रांमध्ये ते थेट ॲक्सेस करू शकता.
अनुपलब्ध असलेल्या myshopify.com URL चे ट्रबलशूटिंग करा

तुम्हाला हवा असलेला myshopify.com URL अनुपलब्ध असल्यास:

  • तो URL आधीपासूनच एखाद्या दुसऱ्या स्टोअरद्वारे (सक्रिय किंवा रद्द केलेले) वापरला जात असू शकतो.
  • तो URL राखीव किंवा प्रतिबंधित असू शकतो.

तुमचे पर्याय:

  • तुमच्या इच्छित URL चा एखादा प्रकार वापरून पहा (उदाहरणार्थ, तुमचे ठिकाण किंवा एखादा नंबर जोडणे).
  • एक तात्पुरता URL निवडा आणि तो नंतर बदला. लक्षात ठेवा की तुम्ही तो फक्त एकदाच बदलू शकता.
  • तुमच्या स्टोअरफ्रंटसाठी कस्टम डोमेन वापरा, जे ग्राहकांना दिसते.
स्टोअर तयार करताना येणाऱ्या एरर्सचे ट्रबलशूटिंग करा

स्टोअर तयार करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला एरर मेसेज मिळाल्यास:

  1. तुमचा ब्राउझर रिफ्रेश करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
  2. तुमच्या ब्राउझरमधील कॅशे आणि कुकीज क्लिअर करा.
  3. वेगळा ब्राउझर किंवा इग्नोग्निटो/प्रायव्हेट मोड वापरून पहा.
  4. स्टोअर्स तयार करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक परवानग्या असल्याची पडताळणी करा.
  5. एरर तशीच राहिल्यास, एरर मेसेजचा स्क्रीनशॉट घ्या आणि Shopify सपोर्टशी संपर्क साधा.

स्टोअर तयार करण्याबाबत तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधण्यापूर्वी

तुमची समस्या लवकर सोडवण्यात मदत करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधण्यापूर्वी खालील माहिती गोळा करा:

  • तुमच्या संस्थेतील विद्यमान स्टोअरचा myshopify.com URL
  • तुमच्या संस्थेचे नाव
  • तुम्हाला आलेल्या कोणत्याही एरर मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स
  • वरील ट्रबलशूटिंग विभागातून तुम्ही आधीच प्रयत्न केलेल्या पायऱ्या
  • स्टोअर्स तयार करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक परवानग्या असल्याची पुष्टी
  • नवीन स्टोअरसाठी तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करत असलेला myshopify.com URL (लागू असल्यास)

ही माहिती तयार ठेवल्यामुळे Shopify सपोर्ट तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकेल.