सेटिंग्ज पृष्ठावरील पर्यायांसाठी आवश्यक स्टोअर परवानग्या
सेटिंग्ज व्यवस्थापित करा परवानगी, तुमच्या Shopify अॅडमिनच्या सेटिंग्ज पृष्ठावरील काही, परंतु सर्वच नाही, अशा पृष्ठे आणि पर्यायांचा ॲक्सेस प्रदान करते. इतर पृष्ठे आणि पर्यायांना ॲक्सेसची अनुमती देण्यासाठी, तुम्हाला युजरच्या भूमिकेत किमान आवश्यक स्टोअर परवानग्या जोडणे आवश्यक आहे.
| सेटिंग्ज पर्याय | वर्णन | किमान आवश्यक परवानग्या |
|---|---|---|
| स्टोअर सेटिंग्ज | तुम्हाला तुमची स्टोअर सेटिंग्ज पाहण्याची आणि अपडेट करण्याची अनुमती देते. |
|
| स्टोअर अॅक्टिव्हिटी लॉग | तुम्हाला स्टोअर अॅक्टिव्हिटी लॉग पाहण्याची अनुमती देते, जो तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये केलेल्या बदलांची सूची देतो. स्टोअर ॲक्टिव्हिटी लॉगची नवीन आवृत्ती टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जात आहे. नवीन स्टोअर ॲक्टिव्हिटी लॉग हे स्टोअर मालक, संस्था मालक आणि प्रशासक भूमिका असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, उदाहरणार्थ प्रशासक, संस्था प्रशासक किंवा स्टोअर वापरकर्ता प्रशासक भूमिका. वापरकर्त्यांचे व्यवस्थापन करू शकणाऱ्या इतर काही कर्मचाऱ्यांनादेखील याचा ॲक्सेस आहे. किमान आवश्यक परवानग्या असलेले इतर वापरकर्ते सद्य स्टोअर ॲक्टिव्हिटी लॉग पाहतात. |
|
| प्लॅन | तुम्हाला तुमचा Shopify प्लॅन पाहण्याची अनुमती देते. कोणताही युझर प्लॅनचे तपशील पाहू शकतो, परंतु फक्त स्टोअर मालक किंवा प्लॅन व्यवस्थापित करा परवानगी असलेले युझर्स प्लॅनमध्ये बदल करू शकतात. फक्त स्टोअर मालक स्टोअर निष्क्रिय करू शकतो. | |
| पेमेंट्स | तुम्हाला तुमच्या स्टोअरचे पेमेंट प्रदाते आणि पेआउट माहिती सक्रिय करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची अनुमती देते. युजरकडे फक्त सेटिंग्ज व्यवस्थापित करा आणि चेकआउट आणि ग्राहक खाती या परवानग्या असल्यास, ते फक्त पेमेंट माहिती ॲक्सेस करू शकतात. युजरकडे फक्त सेटिंग्ज व्यवस्थापित करा, चेकआउट आणि ग्राहक खाती आणि इतर पेमेंट सेटिंग्ज व्यवस्थापित करा परवानग्या असल्यास, ते गिफ्ट कार्ड समाप्ती तारखा आणि Apple Wallet पासेससह पेमेंट सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतात. युजरकडे सेटिंग्ज व्यवस्थापित करा, चेकआउट आणि ग्राहक खाती आणि Shopify Payments पेआउट्स पहा या परवानग्या असल्यास, ते Shopify Payments पेआउट माहिती अॅक्सेस करू शकतात. फक्त स्टोअर मालक Shopify Payments खाते सक्रिय करू शकतो, त्यावर स्विच करू शकतो किंवा त्यात बदल करू शकतो. नोंद: युनायटेड स्टेट्समधील मर्चंट्ससाठी, पेआउट्स पर्याय Shopify ॲडमिनच्या वित्त विभागात आहे. |
|
| चेकआउट आणि ग्राहक खाती | तुम्हाला तुमची ऑनलाइन चेकआउट प्रक्रिया आणि ग्राहक खाते सेटिंग्ज सानुकूलित करण्याची अनुमती देते. |
|
| शिपिंग आणि वितरण | तुम्ही तुमच्या ग्राहकांना ऑर्डर्स कशा शिप करता, हे व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| कर आणि शुल्क | तुमचे स्टोअर कर आणि शुल्क कसे आकारते, हे व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| स्थाने | तुम्ही ज्या ठिकाणी इन्व्हेंटरी स्टॉक करता, ऑर्डर्स पूर्ण करता आणि उत्पादने विकता, ती ठिकाणे व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| गिफ्ट कार्ड्स | तुम्हाला Apple Wallet पासेस सक्रिय करण्याची आणि गिफ्ट कार्ड समाप्तीच्या तारखा सेट करण्याची अनुमती देते. |
|
| आंतरराष्ट्रीय विक्री साधने | तुम्ही तुमची उत्पादने आणि सेवा विकता, ते विविध देश आणि प्रदेश व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| अॅप्स आणि विक्री चॅनेल्स | तुमची उत्पादने आणि सेवा विकण्यासाठी तुम्ही वापरत असलेले अॅप्स आणि विक्री चॅनेल्स व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| डोमेन्स | तुम्हाला Shopify द्वारे नवीन डोमेन खरेदी करण्याची किंवा तुमचे तृतीय-पक्ष डोमेन Shopify शी कनेक्ट करण्याची अनुमती देते. |
|
| ब्रँड | तुम्हाला तुमची ब्रँड मालमत्ता व्यवस्थापित करण्याची अनुमती देते, जेणेकरून तुम्ही ती अनेक विक्री चॅनेल्सवर वापरू शकता. |
|
| नोटिफिकेशन्स | तुम्हाला आणि तुमच्या ग्राहकांना पाठवली जाणारी नोटिफिकेशन्स व्यवस्थापित करण्याची अनुमती देते. |
|
| कस्टम डेटा | खालील संसाधनांसाठी मेटाफील्ड्स जोडून तुम्हाला तुमचे स्टोअर विस्तारित करण्याची अनुमती देते:
|
|
| कस्टम सामग्री किंवा डेटा रचनांसाठी बहु-क्षेत्र ऑब्जेक्ट्स जोडून तुम्हाला तुमचे स्टोअर विस्तारित करण्याची अनुमती देते. |
| |
| भाषा | तुमचे ग्राहक तुमच्या स्टोअरवर पाहू शकतील अशा भाषा व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| धोरणे | परतावे, गोपनीयता आणि सेवेच्या अटी आणि शिपिंगबाबत तुमच्या स्टोअरची धोरणे व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| ग्राहक गोपनीयता | तुमचे गोपनीयता धोरण, कुकी बॅनर, डेटा शेअरिंग ऑप्ट-आउट पृष्ठ आणि मार्केटिंग सेटिंग्जसह, तुमच्या स्टोअरची गोपनीयता धोरणे व्यवस्थापित करण्याची अनुमती तुम्हाला देते. |
|
| तुम्हाला Shopify Network Intelligence सक्षम किंवा अक्षम करण्याची अनुमती देते. |
|