वापरकर्ता ॲक्टिव्हिटी आणि लॉगिन इतिहास
तुम्ही तुमच्या स्टोअर किंवा संस्थेमधील वापरकर्ता व्यवस्थापनाशी संबंधित ॲक्टिव्हिटीचे, तसेच तुमच्या Shopify ॲडमिनमधील वापरकर्त्यांच्या सर्वात अलीकडील लॉगिन इतिहासाचे परीक्षण करू शकता.
केवळ पात्र वापरकर्ते वापरकर्ता ॲक्टिव्हिटी ॲक्सेस करू शकतात.
वापरकर्ता व्यवस्थापन ॲक्टिव्हिटी लॉग
वापरकर्ता व्यवस्थापन ॲक्टिव्हिटी लॉग वापरकर्त्याच्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित इव्हेंट रेकॉर्ड करतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा वापरकर्ता किंवा वापरकर्ता भूमिका तयार केली जाते, संपादित केली जाते किंवा हटविली जाते. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिन सेटिंग्जमधील वापरकर्ते > सुरक्षा पेजवरील वापरकर्ता व्यवस्थापन ॲक्टिव्हिटी लॉग मध्ये तुमच्या स्टोअर किंवा संस्थेमधील वापरकर्ता व्यवस्थापनाशी संबंधित ॲक्टिव्हिटीचे परीक्षण करू शकता.
| कॉलम | वर्णन |
|---|---|
| इव्हेंट | वापरकर्त्याने घेतलेल्या कृतीचे वर्णन. उदाहरणार्थ, "वापरकर्त्याला मर्चंडायझर ही भूमिका नियुक्त केली होती." |
| संसाधन | कृतीमुळे प्रभावित झालेले क्षेत्र. उदाहरणार्थ वापरकर्ते. |
| तारीख | टाइमझोनसह इव्हेंट कधी घडला त्याचा टाइमस्टॅम्प. उदाहरणार्थ, "6/27/2024, 11:16 AM EST". |
| वापरकर्ता | वापरकर्त्याचे नाव. |
टप्पे:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > वापरकर्ते > सुरक्षा वर जा.
वापरकर्ता व्यवस्थापन ॲक्टिव्हिटी लॉग विभागात, पहा वर क्लिक करा.
पर्यायी: इव्हेंटबद्दल अधिक तपशील पाहण्यासाठी, इव्हेंटवर क्लिक करा.
लॉगिन इतिहास पहा
तुम्ही तुमच्या स्टोअर किंवा संस्थेतील कोणत्याही वापरकर्त्याचा लॉगिन इतिहास तपासू शकता. कर्मचारी त्यांचे स्वतःचे वैयक्तिक लॉगिन इतिहास देखील तपासू शकतात. अज्ञात ISP, ठिकाणे किंवा IP ॲड्रेसवरून ॲक्सेस केले गेले नाही ना, हे पडताळून पाहण्यासाठी तुम्ही वापरकर्त्यांचे लॉगिन इतिहास वेळोवेळी तपासले पाहिजेत. हे कर्मचाऱ्याचे खाते धोक्यात आले असल्याचे लक्षण असू शकते.
टप्पे:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > वापरकर्ते वर जा.
ज्या वापरकर्त्याचा लॉगिन इतिहास तुम्हाला तपासायचा आहे, त्या वापरकर्त्यावर क्लिक करा.
भूमिका अंतर्गत,
बटण > स्टोअर पहा वर क्लिक करा.
स्टोअरवरील अलीकडील ॲक्सेस विभागात, पाच सर्वात अलीकडील लॉगिन सत्रे आणि प्रत्येक सत्राबद्दलची खालील माहिती तपासा:
- तारीख
- IP ॲड्रेस
- ISP (इंटरनेट सेवा प्रदाता)
- लॉगिन करताना कर्मचाऱ्याचे ठिकाण
- ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टीम
पर्यायी: संपूर्ण ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टीम तपशील पाहण्यासाठी, उपकरण आणि ब्राउझर कॉलममधील लहान केलेल्या मूल्यावर तुमचा कर्सर फिरवा.