मर्चंटसाठी 3D मॉडेल्स तयार करणे

जेव्हा तुम्ही एखाद्या मर्चंटच्या वतीने उत्पादनांचे 3D मॉडेल्स तयार करता, तेव्हा मॉडेलने ठराविक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तुमच्या मॉडेलने त्या मानकांची पूर्तता केल्यास मर्चंटला ऑगमेंटेड रिॲलिटी (AR), व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), उत्पादन रेंडरिंग आणि मार्केटिंग यांसह अनेक वेगवेगळ्या अनुभवांसाठी वापरता येईल असे उच्च-गुणवत्तेचे, अष्टपैलू मॉडेल मिळते. मॉडेलने मानकांची पूर्तता न केल्यास मर्चंट मॉडेल नाकारण्याची शक्यता असते.

3D मॉडेलने ज्या मॉडेलिंग मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे ते हे मार्गदर्शक स्पष्ट करते आणि मर्चंटने मॉडेल नाकारण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या काही सामान्य त्रुटींवर प्रकाश टाकते.

सामान्यपणे वापरले जाणारे 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर

मर्चंटसाठी 3D मॉडेल्स तयार करण्याकरिता सामान्यपणे खालील 3D सॉफ्टवेअर वापरले जाते:


Maya

Autodesk Maya हे 3D मॉडेलिंगसाठी एक उद्योग मानक आहे. उच्च-गुणवत्तेची 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व टूल्स Maya मध्ये आहेत.


Blender

3D मॉडेलिंगची सुरुवात करण्यासाठी Blender हा एक विनामूल्य पर्याय आणि उत्तम निवड आहे. हे 3D मॉडेल फाईल्सचे पूर्वावलोकन करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे.


3ds Max

3ds Max हे Autodesk कडील आणखी एक 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे. 3ds Max हे Maya इतके मॉडेलिंग-केंद्रीत नाही, परंतु तरीही तुम्हाला आवश्यक असलेली सर्व टूल्स यामध्ये आहेत.


ZBrush

Pixologic चे ZBrush हा एक अंतर्ज्ञानी स्कल्पटिंग प्रोग्राम आहे. ZBrush मध्ये मऊ पृष्ठभाग आणि उच्च-गुणवत्तेचे तपशील तयार करणे सोपे आहे, परंतु ऑप्टिमाइझ केलेले मेश तयार करण्यासाठी ते आदर्श नाही.


Substance Painter

Substance Painter हे एक भक्कम टूल आहे, जे 3D स्पेसमध्ये थेट मॉडेलवर पेंट करून तुम्हाला उच्च-गुणवत्तेचे टेक्स्चर तयार करू देते. GLB फॉरमॅटमधील मॉडेल्स एक्सपोर्ट करण्यासाठीदेखील तुम्ही याचा वापर करू शकता.


Photoshop

Adobe Photoshop हा एक परवडणारा पर्याय आहे, परंतु 3D टेक्स्चर तयार करण्यासाठी तो Substance Painter इतका चांगला नाही.

उच्च-गुणवत्तेच्या मॉडेल्सची वैशिष्ट्ये

उत्पादनाचे मॉडेल तयार करताना तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत अशा काही सर्वोत्तम पद्धती खाली दिल्या आहेत. या सर्वोत्तम पद्धती तुम्हाला AR Quick Look, ब्राउझर्समधील 3D व्ह्यूअर्स, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि उत्पादन रेंडर्स यांसह विविध मार्गांनी वापरले जाऊ शकेल असे अचूक, उच्च-गुणवत्तेचे मॉडेल तयार करण्यात मदत करतात.

दृश्य अचूकता

  • मॉडेल संदर्भ फोटोंसारखेच दिसते.

  • मॉडेल खऱ्या-जगातील स्केलवर तयार केले जाते. मॉडेलरने मॉडेलला खऱ्या उत्पादनाच्या अचूक आकाराचे बनवण्यासाठी योग्य युनिट्स वापरणे आवश्यक आहे:

    खऱ्या टेबलइतक्याच उंचीवर (73cm) बनवलेल्या टेबल मॉडेलचे साईड व्ह्यू.

मेश गुणवत्ता

  • मॉडेलमध्ये केवळ आवश्यक तितकीच भूमिती आहे:

    डावीकडे: आवश्यक प्रमाणात भूमिती असलेले मॉडेल. उजवीकडे: खूप जास्त भूमिती असलेले मॉडेल.

  • मॉडेलवर कोणतेही काळे बहुभुज (polygons) नाहीत. काळे बहुभुज हे मॉडेलमध्ये काहीतरी चूक झाल्याचे लक्षण आहे, जसे की दोन पृष्ठभाग ओव्हरलॅप होणे किंवा अनलॉक करण्याची आवश्यकता असलेले नॉर्मल्स:

    काळे बहुभुज असलेल्या मॉडेलचा क्लोज अप.

  • वैयक्तिक भाग वेगळे मॉडेल केले जातात आणि त्यानंतर एखाद्या खऱ्या उत्पादनाची जोडणी केल्याप्रमाणे एकत्र ठेवले जातात:

    डावीकडे: स्वतंत्रपणे मॉडेल केलेले बॅगचे घटक. उजवीकडे: बॅगचे एकत्रित केलेले घटक.

  • गुळगुळीत संक्रमणांसाठी उत्पादनाच्या कडा बेव्हल केल्या आहेत:

    डावीकडे: योग्यरीत्या बेव्हल केलेल्या कडा असलेला घन. उजवीकडे: बेव्हल न केलेल्या कडा असलेला घन.

फिजिकली-बेस्ड रेंडरिंग

फिजिकली-बेस्ड रेंडरिंग (PBR) वर्कफ्लो वापरून टेक्स्चर्स एक्सपोर्ट केली जातात.

GLB फाईलसाठी, तुम्हाला खालील टेक्स्चर मॅप्स एक्सपोर्ट करणे आवश्यक आहे:

  • डिफ्यूज
  • नॉर्मल
  • अनुक्रमे लाल, हिरव्या आणि निळ्या चॅनेल्सवर मॅप केलेले ऑक्लुजन, रफनेस आणि मेटलनससह एकच मॅप
  • एमिसिव्ह (पर्यायी)

मटेरियल गुणवत्ता

  • भूमितीसाठी नियुक्त केलेले मटेरियल्स उत्पादनाच्या संदर्भ फोटोंशी जुळतात.

  • कमी-गुणवत्तेच्या मॉडेल्समध्ये अनेकदा बारकावे आणि सूक्ष्म गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. लहान खरचटलेले डाग, ओरखडे आणि अपूर्णता हे सर्व मॉडेल अधिक विश्वासार्ह बनवण्यात मदत करतात:

    मटेरियलमधील अपूर्णता दर्शवणारा घड्याळाच्या डायलचा क्लोज अप.

  • रिझोल्यूशन राखून टेक्सचर फाईल्स शक्य तितक्या लहान ठेवल्या जातात.

  • मॉडेलच्या प्रत्येक वैशिष्ट्यासाठी (उदा. रफनेस, मेटलनस आणि अँबियंट ऑक्लूजन) फक्त एकच टेक्सचर मॅप आहे:

    घड्याळाच्या मॉडेलसाठी पाच टेक्सचर मॅप्स.

    GLB फाईलसाठी, तुम्हाला खालील मॅप्स समाविष्ट करणे आवश्यक आहे:

    • डिफ्यूज
    • नॉर्मल
    • अनुक्रमे लाल, हिरव्या आणि निळ्या चॅनेल्सवर मॅप केलेले ऑक्लुजन, रफनेस आणि मेटलनससह एकच मॅप
    • एमिसिव्ह (पर्यायी)

रिव्हिजनसाठी मॉडेलिंग

  • मेश क्वाड्रँग्युलेटेड असते, याचा अर्थ यामध्ये चार बाजूंवाली भूमिती वापरली जाते. एखादा विशिष्ट फाईल फॉरमॅट ट्रायँग्युलेटेड (तीन बाजूंवाली) भूमितीला प्राधान्य देत नसल्यास क्वाड्रँग्युलेटेड भूमिती चांगली असते:

    In a quadrangulated model, each polygon has four sides. In a triangulated model, each polygon has three sides.
    डावीकडे: क्वाड्रँग्युलेटेड मॉडेल. उजवीकडे: ट्रायँग्युलेटेड मॉडेल.

  • मॉडेलरने एक चांगली वर्किंग फाईल मेन्टेन केली आहे. ट्रान्सफॉर्मेशन्स फ्रीझ करण्यापूर्वी किंवा इतिहास हटवण्यापूर्वी मॉडेल फाईलची आवृत्ती जपून ठेवल्यास नंतरच्या काळात येणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते.

पॉलीगॉन काऊंट

  • उत्पादनाचे सर्व तपशील राखून मॉडेलचा पॉलीकाऊंट शक्य तितका कमी ठेवला जातो.
  • मॉडेल Facebook 3D पोस्ट्स, AR Quick Look आणि VR यांसारख्या विविध मीडिया फॉरमॅट्सच्या पॉलीकाऊंट मर्यादेचे पालन करते, जिथे ते मॉडेल वापरले जाऊ शकते.

UV लेआउट

  • सर्व UV शेल्स एकाच टेक्सचर मॅपवर मॅप केलेले आहेत.

  • सर्व UV शेल्स 1:1 स्पेसमध्ये ठेवलेले आहेत.

  • कोणतेही UV शेल्स ओव्हरलॅप होत नाहीत.

  • UV सीम्स 3D मॉडेलच्या नैसर्गिक सीमांवर ठेवल्या आहेत.

  • योग्य अनरॅपिंग तंत्रांचा वापर करून UV शेल्स मॅन्युअली अनरॅप केले गेले आहेत. ऑटोमॅटिक अनरॅपिंग टूल्स वापरली गेली नाहीत:

    1:1 स्पेसमध्ये ठेवलेले अनरॅप केलेले UVs.

उत्पादनाचे मूळ

  • उत्पादनाचे मूळ उत्पादनाच्या तळाशी केंद्रित असते:

    टेबलचे मॉडेल, ज्याचे मूळ त्याच्या तळाशी ठेवलेले आहे.

एक्सपोर्टिंग प्रॅक्टिसेस

  • सर्व ऑब्जेक्ट्स एकाच ऑब्जेक्टमध्ये एकत्र केले आहेत.
  • सर्व कडा मऊ केल्या गेल्या आहेत.
  • मॉडेलचा तळ ग्रिडच्या मूळ स्थानी ठेवला आहे.
  • सर्व ट्रान्सफॉर्मेशन्स फ्रीझ केली गेली आहेत.
  • सर्व इतिहास हटवला गेला आहे.
  • जोपर्यंत वेगळी आवश्यकता नसेल, तोपर्यंत मॉडेलला फक्त एकच मटेरिअल असाइन केलेले असते.

तांत्रिक आवश्यकता

  • मॉडेल मर्चंटला GLB फॉरमॅटमध्ये पाठवले गेले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी, पूर्ण झालेली मॉडेल्स मर्चंटला डिलिव्हर करणे ला भेट द्या.
  • फाईलचा एकूण आकार साधारण 4 MB असावा. काही माध्यमांसाठी लहान आकाराची आवश्यकता असू शकते.
  • शक्य असल्यास, टेक्सचर्स ऑप्टिमाईझ केलेल्या JPG फाईल्स असाव्यात.

नमुना मॉडेल्स

खालील मॉडेल्स 3D मॉडेलिंग मानकांच्या चेकलिस्ट मधील सर्व निकष पूर्ण करतात. तुम्ही मर्चंटला देत असलेली मॉडेल्सही तशाच दर्जाची असावीत.

मॉडेल्स डाउनलोड करा

सॉफ्ट उत्पादने आणि हार्ड उत्पादने

सॉफ्ट उत्पादनांचा आकार स्पर्श आणि गुरुत्वाकर्षणामुळे बदलू शकतो. कपडे, ब्लँकेट्स आणि उशा ही त्याची काही उदाहरणे आहेत. सॉफ्ट उत्पादने लवचिक दिसायला हवीत. ती रिअल दिसण्यासाठी त्यामध्ये घड्या आणि सुरकुत्या असाव्यात. त्यांच्यावर गुरुत्वाकर्षण काम करत आहे, हे दिसेल अशा पद्धतीने सॉफ्ट उत्पादने मॉडेल केली पाहिजेत. मर्चंटला तो आयटम कसा दाखवायचा आहे (उदा. व्यवस्थित घडी केलेला, हँगरवर अडकवलेला किंवा सपाट ठेवलेला), हे नेहमी लक्षात ठेवा.

हार्ड उत्पादने स्पर्श आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असूनही त्यांचा आकार टिकवून ठेवतात. फुलदाण्या, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक्स ही त्याची काही उदाहरणे आहेत. त्यांच्या कडा आणि भूमिती सुस्पष्ट असली पाहिजे. पृष्ठभाग साधारणपणे पूर्णपणे गुळगुळीत असतात आणि प्रकाश चांगल्या प्रकारे परावर्तित करतात. अपूर्णता टेक्सचर्समध्ये असतात पण भूमितीमध्ये नसतात. अधिक रिअलिझमसाठी कडा बेव्हल केलेल्या असाव्यात.

डावीकडे: एक सॉफ्ट उत्पादन. उजवीकडे: एक हार्ड उत्पादन.

अति-तपशीलवार उत्पादने आणि लार्ज-स्केल उत्पादने

अति-तपशीलवार उत्पादनांमध्ये टेक्सचर्स, लेबल्स किंवा लोगो असतात, ज्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. उत्पादने दिसायला क्लिअर आणि स्पष्ट असली पाहिजेत. त्यांची टेक्सचर स्पेस पूर्णपणे ऑप्टिमाईझ केलेली असणे महत्त्वाचे आहे. त्यांचे टेक्सचर्स व्यवस्थितरीत्या पेंट केलेले असावेत. उच्च रिझोल्यूशनसह टेक्सचर्स पेंट करण्यास सुरुवात करा आणि आवश्यक असल्यास फाईल संकुचित करा. गरज असल्यास, लोगो आणि मजकूर असलेल्या भूमितीच्या भागांना UV मॅपवर अधिक जागा घेऊ द्या.

लार्ज-स्केल उत्पादने सरासरी उत्पादनापेक्षा जास्त जागा घेतात. काउच, कार आणि सायकली ही त्याची काही उदाहरणे आहेत. या प्रकारच्या उत्पादनांचे टेक्सचर्स पूर्णपणे ऑप्टिमाईझ केलेले असणे महत्त्वाचे आहे. ही उत्पादने सीनमध्ये खूप मोठी असतील, त्यामुळे स्ट्रेच केलेले किंवा कमी रिझोल्यूशनचे टेक्सचर्स युझरला अधिक ठळकपणे दिसतील. लार्ज-स्केल उत्पादनांसाठी टेक्सचर्स सहसा किमान 2K असावेत. उच्च रिझोल्यूशन टेक्सचरसह पेंट करण्यास सुरुवात करा आणि आवश्यक असल्यास फाईल संकुचित करा.

डावीकडे: एक अति-तपशीलवार उत्पादन. उजवीकडे: एक लार्ज-स्केल उत्पादन.

वेळेच्या अपेक्षा

मॉडेलिंग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तुम्ही मर्चंटसोबत मॉडेलच्या अपेक्षांबद्दल चर्चा केली पाहिजे. त्यांनी दिलेल्या फोटोंच्या आधारे मॉडेल तयार करण्यासाठी किती वेळ लागेल, याचा अंदाज तुम्ही मर्चंटला दिला पाहिजे. खालील घटक मॉडेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर परिणाम करू शकतात:

  • मॉडेलची गुंतागुंत
  • टेक्सचरची गुंतागुंत
  • व्हेरिएंट पर्यायांची संख्या
  • मर्चंट्सनी दिलेल्या डायमेंशन्सची अचूकता
  • मर्चंटने दिलेल्या उत्पादनांच्या फोटोंचा दर्जा आणि संख्या

गुणवत्ता परीक्षण

जेव्हा तुम्हाला मॉडेल पूर्ण झाल्यासारखे वाटते, तेव्हा तुम्ही त्यांना पूर्ण झालेल्या सर्व फाईल्स पाठवण्यापूर्वी तुम्ही आणि मर्चंटने त्याचे परीक्षण केले पाहिजे. मर्चंटला त्यांची उत्पादने चांगल्या प्रकारे माहीत असतात आणि एखादे मॉडेल त्यांच्या उत्पादनांचे अचूक प्रतिनिधित्व करते की नाही, हे ते सांगू शकतात.

तुमचे स्वतःचे परीक्षण पूर्ण करण्यासाठी, तुम्ही मानकांच्या चेकलिस्ट चा वापर केला पाहिजे. मर्चंटला पाठवण्यापूर्वी मॉडेल शक्य तितके अचूक आणि उत्तम प्रकारे तयार केलेले आहे, याची चेकलिस्ट वापरल्यामुळे खात्री होते. याचा अर्थ असा, की मॉडेल डिलिव्हर केल्यानंतर तुम्हाला त्यात सुधारणा करण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे मॉडेलचा टर्नअराऊंड वेळ कमी होतो.

जेव्हा तुम्ही मर्चंटला मॉडेल पाठवता, तेव्हा खालील गोष्टी करण्याची खात्री करा:

  • 360 अंशांमध्ये तपासले जाऊ शकेल अशा फॉरमॅटमध्ये मॉडेल पाठवा.
  • मॉडेलचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी मर्चंटकडे योग्य उपकरण आहे का, ते तपासा.
  • लागू असल्यास, फाईल आवश्यक फॉरमॅटमध्ये काम करत असल्याची खात्री करा.

जेव्हा मानकांच्या चेकलिस्टमधील सर्व आयटम्स पूर्ण केले जातात आणि मर्चंट 3D मॉडेलवर समाधानी असतो, तेव्हा मॉडेलला मंजूर मानले जाऊ शकते.

खाली गुणवत्तेसंबंधी काही सामान्य समस्या आहेत, ज्यामुळे मर्चंटकडून मॉडेल नाकारले जाऊ शकते:

चुकीचे स्केल

मॉडेलचा आकार खऱ्या उत्पादनासारखा नाही. जेव्हा ऑगमेंटेड रिॲलिटीमध्ये खऱ्या उत्पादनाच्या बाजूला मॉडेल ठेवले जाते, तेव्हा त्यांचा आकार समान असावा.

प्रमाणात नसलेले घटक

3D मॉडेलमधील एखादा घटक मॉडेलच्या इतर घटकांच्या प्रमाणात नाही. मॉडेल सुरू करण्यापूर्वी उत्पादनाच्या भागांबद्दल पुरेशी माहिती गोळा केल्याची खात्री करा. अनेक कोनांमधून संदर्भ फोटो असणे उपयुक्त ठरते जेणेकरून तुम्ही सर्व बाजूंनी घटक पाहू शकाल आणि केवळ लिखित मोजमापांवरून काम करत नाही.

चुकीची जिओमेट्री

जिओमेट्रीमध्ये काही चुका असू शकतात, ज्याचा मॉडेल कसे प्रदर्शित होते यावर परिणाम होतो. लक्षात ठेवण्यासाठी खालील सामान्य चुकांची उदाहरणे दिली आहेत:

  • चुकीचे स्मूथिंग
  • चुकीचे चॅम्फरिंग
  • चार ऐवजी पाच बाजू असलेले पॉलीगॉन्स, ज्यामुळे पिंचिंग होऊ शकते
  • Z-फायटिंग (एकाच जागी असलेले डुप्लिकेट पॉलीगॉन्स)
  • डेसिमेशन किंवा ट्रँग्युलेशन (शक्य असेल तिथे नेहमी क्वॉड्स वापरा)
  • क्लिपिंग किंवा इंटरपेनेट्रेशन
  • एकाधिक UV सेट्स
  • एक्सपोर्ट करताना लागू केलेले एकाधिक मटेरिअल्स

अनसील्ड जिओमेट्री

ऑगमेंटेड रिॲलिटी किंवा इतर काही मीडियामध्ये, जिओमेट्रीतील छिद्रे आणि गॅप्स पाहणे सोपे आहे. सर्व कडा सील केल्या आहेत आणि पॉईंट्स जोडले आहेत याची खात्री करा.

चुकीचा आकार

मॉडेलचा आकार उत्पादनाशी जुळत नाही. प्रमाण आणि आकार काळजीपूर्वक तपासा. तुमच्या मॉडेलचा सिल्हूट उत्पादनाच्या संदर्भ फोटोंशी जुळला पाहिजे.

चुकीचे मटेरिअल्स

मॉडेलचे मटेरिअल्स उत्पादनाशी जुळत नाहीत. विश्वासार्हतेसाठी तपशीलवार मटेरिअल्स हे मुख्य सूत्र आहे. मटेरिअल्समध्ये योग्य प्रमाणात रिफ्लेक्टिव्हिटी, ग्लॉसीनेस आणि ट्रान्सपरन्सी आहे याची खात्री करा.

कमी रिझोल्यूशन आणि अस्पष्ट टेक्स्चर्स

टेक्स्चर फाइल्स कमी-रिझोल्यूशनच्या आणि अस्पष्ट आहेत. तुम्ही टेक्स्चर फाइल्स तयार करता, तेव्हा हाय रिझोल्यूशनपासून सुरुवात करा. तुम्हाला कोणत्या आकाराची टेक्स्चर फाईल हवी आहे यानुसार तुम्ही नंतर रिझोल्यूशन कमी करू शकता. मोबाईल वेबसाठी, टेक्स्चर फाइल्स 2048 x 2048 px पेक्षा मोठ्या नसाव्यात. आकार ऑप्टिमाइझ करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या-आकाराच्या टेक्स्चर्सचे मिश्रण वापरू शकता.

डिस्टोर्टेड UVs

मॉडेलचे UVs डिस्टोर्टेड आहेत. UVs मधील स्ट्रेचिंग किंवा डिस्टॉर्शनकडे लक्ष द्या. ज्या आयटम्सना अधिक तपशील किंवा लक्ष देण्याची गरज आहे (जसे की लोगो आणि प्रदर्शित केला जाणारा मजकूर) त्यांना योग्य प्रमाणात जागा दिली गेली आहे याची खात्री करा.

मर्चंटला पूर्ण झालेली मॉडेल्स डिलिव्हर करणे

जेव्हा मॉडेल पूर्ण आणि मंजूर होते, तेव्हा तुम्ही तुम्हाला आणि त्यांना सर्वोत्तम वाटणाऱ्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून मर्चंटला सर्व मॉडेल फाइल्स डिलिव्हर करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही ईमेल किंवा Dropbox वापरू शकता.

सर्व 3D मॉडेल्स GLB फाइल्स म्हणून डिलिव्हर करा. बहुतांश 3D व्ह्यूअर्सद्वारे GLB फॉरमॅट वापरला जातो. GLB फाइल्स सिंगल फाइल्स असतात ज्यामध्ये मॉडेल आणि टेक्स्चर्सचा समावेश असतो.

खालील तीन मार्गदर्शक तीन लोकप्रिय 3D मॉडेलिंग प्रोग्राम्स वापरून GLB फाइल्स कशा तयार करायच्या हे स्पष्ट करतात: