3ds Max आणि Substance Painter वापरून GLB फाईल्स तयार करणे
Shopify ॲडमिनमध्ये उत्पादनामध्ये जोडली जाऊ शकणारी GLB फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही 3ds Max आणि Substance Painter वापरू शकता. 3D मॉडेल्स ग्राहकांना उत्पादने व्हिज्युअलाइझ करण्यासाठी मदत करू शकतात, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढू शकतो आणि रिटर्न्स कमी होऊ शकतात.
या पेजवर
3ds Max मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी तुमचे मॉडेल तयार करा
तुमचे मॉडेल एक्सपोर्ट करण्यासाठी तयार करताना, तुम्हाला ते एकच मेश असल्याची आणि त्याला एकच मटेरिअल लागू केले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
पायऱ्या:
- फाईल > इम्पोर्ट... > इम्पोर्ट... वर क्लिक करा.
- तुमची मॉडेल फाईल निवडा आणि नंतर ओपन करा वर क्लिक करा.
- OBJ Import Options dialog मध्ये, Import as a single mesh चेक करा.
- Import वर क्लिक करा.
- मॉडेलला 0-1 स्पेसमध्ये अनरॅप करा. कोणतेही UV ओव्हरलॅप होणार नाहीत याची खात्री करा:

- संपूर्ण मॉडेलवर एकच मटेरियल अप्लाय करा.
3ds Max मधून मेश एक्सपोर्ट करा
- File > Export > Export... वर क्लिक करा.
- फाईलचे नाव आणि तुम्हाला जिथे मॉडेल एक्सपोर्ट करायचे आहे ते ठिकाण टाका.
- Save as Type ड्रॉप-डाउन मेनू मधून, OBJ-Export (.OBJ) निवडा.
- Save वर क्लिक करा.
- OBJ Export Options डायलॉगमध्ये, डीफॉल्ट पर्याय तसेच ठेवा आणि Export वर क्लिक करा.
Substance Painter मध्ये OBJ फाईल इम्पोर्ट आणि तयार करा
- File > New वर क्लिक करून नवीन Substance Painter प्रोजेक्ट तयार करा.
- मेश निवडण्यासाठी New project डायलॉगमध्ये, Select वर क्लिक करा.
- तुम्ही 3ds Max मधून एक्सपोर्ट केलेली OBJ फाईल निवडा आणि त्यानंतर Open वर क्लिक करा.
- New project विंडोमध्ये, OK वर क्लिक करा.
- तुम्ही तुमचे मेश योग्यरित्या एक्सपोर्ट केले आहे का ते पडताळण्यासाठी Texture set list पॅनेलमध्ये फक्त एकच टेक्स्चर सेट असल्याची खात्री करा.
- एकापेक्षा जास्त टेक्स्चर सेट दिसल्यास, Multiple texture sets पहा.
- या Texture set settings पॅनेलमध्ये, चॅनेल जोडण्यासाठी
+बटणावर क्लिक करा:
- आवश्यक: अॅम्बियंट ऑक्लुजन.
- ऐच्छिक: एमिसिव्ह. तुमच्या मॉडेलमध्ये प्रकाश उत्सर्जित करणारे घटक असल्यास हे चॅनेल जोडा.
- ऐच्छिक: ओपॅसिटी. तुमच्या मॉडेलमध्ये पारदर्शक असणारे घटक असल्यास हे चॅनेल जोडा.
- Texture set settings पॅनेलमध्ये, Bake Mesh Maps वर क्लिक करा.
- मॉडेलवर टेक्स्चर पेंट करा.
मल्टिपल टेक्स्चर सेट्स
तुम्ही Substance Painter मध्ये OBJ फाईल इम्पोर्ट करता, तेव्हा तिथे फक्त एकच टेक्स्चर सेट असावा:

एकापेक्षा जास्त टेक्स्चर सेट दिसल्यास, 3ds Max मधून मेश एक्सपोर्ट करताना खालीलपैकी काहीतरी चुकीचे होते:
- मेश एका ऑब्जेक्टमध्ये एकत्रित केले नव्हते.
- मेशला एकापेक्षा जास्त टेक्स्चर असाइन केले होते.
असे असल्यास, तुमचे मॉडेल 3ds Max मधून पुन्हा एक्सपोर्ट करा आणि मेश एकच ऑब्जेक्ट असल्याची आणि त्याला फक्त एकच टेक्स्चर असाइन केले असल्याची खात्री करा.
Substance Painter मधून glTF फाईल एक्सपोर्ट करा
File > Export Textures वर क्लिक करा.
Config ड्रॉप-डाउन मेनू मधून, glTF PBR Metal Roughness निवडा.
तुम्हाला तुमचे टेक्स्चर जिथे सेव्ह करायचे आहेत ते ठिकाण निवडा.
टेक्स्चर फाईल किती मोठ्या असतील हे ठरवण्यासाठी डॉक्युमेंटचा आकार निवडा.
Export वर क्लिक करा.
टेक्स्चर फाईल्स कॉम्प्रेस करणे
तुम्ही मॉडेल एक्सपोर्ट करता, तेव्हा तुमच्याकडे खालील फाईल्स असाव्यात:
- modelName.bin
- modelName.glb
- modelName.gltf
- modelNamebaseColor.png
- modelNamenormal.png
- modelName_occlusionRoughnessMetallic.png
glTF PBR Metal Roughness कॉन्फिगरेशन वापरताना, Substance Painter टेक्स्चर फाईल्स फक्त PNG फॉरमॅटमध्ये एक्सपोर्ट करते. टेक्स्चर फाईल्स कॉम्प्रेस करण्याचा आणि अल्फा चॅनेलची आवश्यकता नसलेल्या कोणत्याही टेक्स्चरना JPG मध्ये कन्व्हर्ट करण्याचा विचार करा. यामुळे फाईलचा एकूण आकार कमी होतो आणि लहान आकाराच्या फाईल्समुळे डाउनलोड स्पीड वाढतो आणि संवाद अधिक सुरळीत होतो.
तुमच्या फाईलचा आकार 4 MB किंवा त्यापेक्षा कमी ठेवणे सर्वोत्तम आहे.
GLB फाईल तयार करा
- https://glb-packer-old.glitch.me/ ला भेट द्या.
- तुम्ही Substance Painter मधून एक्सपोर्ट केलेल्या फाईल्स GLB Packer वेब पेजवर ड्रॅग आणि ड्रॉप करा.
out.glb नावाची फाईल तुमच्या काँप्युटरवर डाउनलोड केली जाईल. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही फाईलचे नाव बदलू शकता आणि त्यानंतर ती Shopify वर अपलोड करू शकता.